Maharashtra HSC Exam 2026 Begins Today
esakal
Maharashtra HSC Exam 2026 Start Today: १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची मोठी लगबग पाहायला मिळणार आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात जमावबंदीचा आदेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेली बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. यंदा बारावीची परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. सकाळचे सत्र ११ ते २ ते दुपारचे सत्र ३ ते ६ या वेळेत होणार आहे.
बारावीची परीक्षा ही आयुष्यातील एक महत्त्वाचा वळणबिंदू मानली जाते. या परीक्षेला दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. परीक्षांच्या काळात अनेकांच्या मनावर दडपण येणं साहजिकच आहे. मात्र लक्षात ठेवा, ही परीक्षा शैक्षणिक आहे. आयुष्याची नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आत्मविश्वासाने सामोरे जा. अभ्यासाचे योग्य नियोजन आणि शांत मन असल्यास कठीण वाटणारी ही परीक्षाही सोपी वाटे. परीक्षेला जाताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी जाणून घेऊयात.
परीक्षेच्या दिवशी वाहतूक कोंडीचा विचार करून घरातून वेळेआधी निघणे आवश्यक आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. बागेत प्रवेशपत्रासोबत शाळेचे ओळखपत्रही जवळ ठेवा. पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, मोजपट्टी, कंपास, पॅड, पाण्याची बाटली आणि साधे घड्याळ आवश्यक साहित्य सोबत ठेवा. कोणतेही पुस्तक, वही, मोबाईल फोन किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षागृहात नेण्यास मनाई आहे.
प्रश्नपत्रिका मिळेपर्यंत मन शांत ठेवा. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ती काळजीपूर्वक वाचा. प्रश्न अवघड वाटले, तरी घाबरू नका आणि प्रश्न सोपे वाटले तरी घाई करू नका. शांतपणे आणि आत्मविश्वासाने उत्तरे लिहा. उत्तरपत्रिकेवरील सर्व माहिती सुवाच्य अक्षरात व अचूक भरा. बारकोड चिकटवण्यापूर्वी तो आपलाच असल्याची खात्री करून घ्या. निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनाचाच वापर करा.
मुलांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचवा. त्यांना मनापासून “ऑल द बेस्ट” म्हणायला विसरू नका. जेवढं येतं तेवढं शांतपणे लिहायचं आहे आणि हार मानायची नाही, असा आत्मविश्वास द्या. मुलांना सकारात्मक शब्दांत प्रोत्साहन द्या व त्यांचा उत्साह वाढवा. परीक्षेला जाताना दही-साखर खाऊ घालणेही विसरू नका.
प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
प्रश्न सोपे वाटतात म्हणून अनावश्यक जास्त लिहू नका; विचारले तेवढेच लिहा.
परीक्षेचा कालावधी लक्षात ठेवून वेळेचे योग्य नियोजन करा.
प्रश्न क्रमांक व उपप्रश्न क्रमांक स्पष्ट आणि ठळक लिहा.
उत्तरांव्यतिरिक्त उत्तरपत्रिकेवर कोणताही अतिरिक्त मजकूर लिहू नका.
परीक्षेच्या काळात आरोग्याची काळजी घ्या; हलका आहार घ्या.
अभ्यासासोबत थोडा व्यायामही करा, त्यामुळे ताण व नैराश्य दूर राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.