AIIMS Job Notification  google
एज्युकेशन जॉब्स

AIIMS Job : १०वी, १२वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी; AIIMSमध्ये भरती, २ लाखांहून अधिक पगार

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे.

नमिता धुरी

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पटना यांनी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

त्यानुसार संस्थेत बंपर पदावर भरती होणार आहे. अधिकृत साइट aiimspatna.edu.in वर जाऊन उमेदवार मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ जून २०२३ निश्चित करण्यात आली आहे. (recruitment of undergraduates in AIIMS)

या मोहिमेद्वारे, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), पाटणा येथे गट A, B आणि C श्रेणींमध्ये ६४४ शिक्षकेतर पदांची भरती केली जाईल.

वरिष्ठ प्रोग्रामर, उप-वैद्यकीय अधीक्षक, जनसंपर्क अधिकारी, वरिष्ठ आहारतज्ज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी, लेखाधिकारी, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, योग प्रशिक्षक, खासगी सचिव आदींची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १० वी, ITI, 10+2, पदवी, डिप्लोमा, PG डिप्लोमा किंवा पदानुसार समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा

अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्जाची फी

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. या मोहिमेसाठी उमेदवारांना तीन हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी २ हजार ४०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अपंग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

निवड अशी होईल

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी, कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय चाचणी यावर आधारित असेल.

पगार

या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना १८ हजार रुपये ते २ लाख ८ हजार ७०० रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT