IBPS Canva
एज्युकेशन जॉब्स

"आयबीपीएस'ने केले लिपिक व अधिकारी पदांचे निकाल जाहीर !

आयबीपीएसने लिपिक व अधिकारी पदांचे निकाल जाहीर केले

श्रीनिवास दुध्याल

प्रादेशिक ग्रामीण बॅंक, इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग कार्मिक सिलेक्‍शनने सीआरपी आरआरबी- IX अंतर्गत ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल I पदासाठी तात्पुरती (वाटप राखीव यादी) अपलोड केली आहे.

सोलापूर : प्रादेशिक ग्रामीण बॅंक (आरआरबी) (Regional Rural Bank), इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग कार्मिक सिलेक्‍शन (आयबीपीएस) (Institute of Banking Personnel Selection) ने सीआरपी आरआरबी- IX अंतर्गत ऑफिस असिस्टंट (लिपिक) आणि ऑफिसर स्केल I (पीओ) पदासाठी तात्पुरती (वाटप राखीव यादी) अपलोड केली आहे. उमेदवार आयबीपीएस आरआरबी प्रोव्हिजनल अलॉटमेंट रिझल्ट आणि आयबीपीएस पीओ प्रोव्हिजनल अलॉटमेंट रिझल्ट आयबीपीएसची अधिकृत वेबसाइट ibps.in वर डाउनलोड करू शकतात. लिंक 20 जून 2021 पर्यंत उपलब्ध आहे. (IBPS announces results for clerk and officer posts)

आयबीपीएस आरआरबी प्रोव्हिजनल अलॉटमेंट (राखीव यादी) पाहण्यासाठी उमेदवार नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख यांसारख्या लॉगइन तपशिलांचा वापर करून निकाल मिळवू शकतात.

असा पाहा निकाल

  • टप्पा 1 : प्रथम आयबीपीएसची अधिकृत वेबसाइट म्हणजेच ibps.in वर जा

  • टप्पा 2 : वेबसाइटवर देण्यात आलेली लिंक Click Here to View Your Result for CRP RRBIX Office Assistant (Provisional Allotment  Reserve List) किंवा Click Here to View Your Result for CRP RRBIXOfficer Scale-I (Provisional Allotment  Reserve List) येथे क्‍लिक करा.

  • टप्पा 3 : उमेदवार लॉगइन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा.

  • टप्पा 4 : आता उमेदवाराकडे आयबीपीएस आरआरबी कार्यालय सहाय्यक तात्पुरती वाटप राखीव यादी 2021 असेल. उमेदवार ते डाउनलोड देखील करू शकतात.

आयबीपीएसने 8424 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली होती, त्यापैकी 4624 रिक्त पदे सहाय्यक पदांसाठी तर 3800 रिक्त पदे आयबीपीएस आरआरबी भरती 2020 (सीआरपी-VIII) अंतर्गत अधिकारी स्केल एक पदासाठी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW T20I: स्मृती मानधनाने रचला नवा विश्वविक्रम, शफाली वर्माचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेविरुद्ध विजयाचा चौकार

Pune Municipal Election : पुण्यात मोठा ट्विस्ट! मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

RPI Protest : जागावाटपावरून रिपाइंची नाराजी; भाजप कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

१११ वर्षांनंतर विदर्भातील पहिला मानाचा पट पुन्हा सुरू, विदर्भ केशरी शंकरपट मैदानाची धावपट्टी गाजणार

SCROLL FOR NEXT