Jobs_SSC 
एज्युकेशन जॉब्स

SSC Recruitment 2020: १२वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 5 हजार पदांची बंपर भरती

सकाळ डिजिटल टीम

SSC CHSL Recruitment 2020: पुणे : कर्मचारी निवड आयोग (SSC- Staff Selection Commission) तर्फे संयुक्त उच्च माध्यमिक स्तरीय परीक्षा 2020 (CHSL) साठी अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 06 नोव्हेंबर 2020 पासून ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे.

या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध विभागात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. अर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे -

पदांचा तपशील :
- लोअर डिव्हिजन लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक - 19,900 ते 63,200 रुपये
- पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट- 25,500 ते 81,100 रुपये
- डेटा एंट्री ऑपरेटर - 25,500 ते 81,100 रुपये

पदांची संख्या नंतर जाहीर केली जाईल. उमेदवारांना याबाबतची सविस्तर माहिती एसएससीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे मिळेल.

महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरूवात - 06 नोव्हेंबर 2020.
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 15 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 पर्यंत)
- ऑनलाईन फी भरण्यासाठी शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 पर्यंत)
- संगणक आधारित परीक्षा (श्रेणी -१) - 12 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021

वय मर्यादा :- 
अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षांपर्यंत निश्चित केले गेले आहे.

शैक्षणिक पात्रता - 
मान्यताप्राप्त बोर्डातून उमेदवाराने 12 वी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. 

अर्ज कसा करावा - 
इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट http://ssc.nic.in/ वर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया - 
पेपर- १ आणि पेपर- २ च्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

फॉर्म फी -
- जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी - 100 रुपये
- इतर कोणत्याही श्रेणीतील उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फॉर्म फी भरावी लागणार नाही.

- अधिकृत सूचनांसाठी येथे क्लिक करा.
- अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

- एज्युकेशन-जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT