SBI Circle Based Officer Recruitment 2026
Esakal
SBI CBO Recruitment 2026 : स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) भरती २०२६ साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत देशभरातील विविध मंडळांमध्ये एकूण २०५० पदे भरली जातील. ही अधिसूचना २८ जानेवारी २०२६ रोजी जारी करण्यात आली होती, तर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २९ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.bank.in ला भेट देऊन १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी SBI ने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
या भरती मोहिमेअंतर्गत देशभरातील प्रमुख मंडळांमध्ये एकूण २०५० पदे भरली जातील. यामध्ये महाराष्ट्र, मुंबई मेट्रो, नवी दिल्ली, अमरावती, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनऊ, आणि तिरुवनंतपुरम यासारख्या मंडळांचा समावेश आहे. सर्व पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सामान्य श्रेणी या श्रेणींमध्ये विभागली गेली आहेत.
ही SBI भरती त्यांच्याठी सुवर्णसंधी आहे, ज्यांच्याकडे पदवी असून बँकिंग क्षेत्रातील कामांचाही अनुभव आहे आणि जे अधिकारी स्तरावरील पदासाठी इच्छुक आहेत. बँकेने स्पष्ट केले आहे की अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील. इतर कोणत्याही पद्धतीने सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
एसबीआय सीबीओ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा कॉस्ट अकाउंटन्सी यासारख्या व्यावसायिक पदवी असलेले उमेदवार देखील पात्र आहेत. तसेच शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त, उमेदवारांना कोणत्याही बँकेत अधिकारी पदावर किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभव नसलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र राहणार नाहीत.
३१ डिसेंबर २०२५ पर्यंत उमेदवारांचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर), अपंग उमेदवार आणि माजी सैनिकांसाठी वयात सूट दिली जाणार आहे.
एसबीआय सीबीओ पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ४८,४८० रुपये प्रारंभिक मूळ पगार मिळेल. नियुक्तीच्या वेळी बँक दोन आगाऊ वेतनवाढ देखील देईल. मूळ पगाराव्यतिरिक्त, अधिकाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता किंवा भाडेपट्टा सुविधा, शहर भत्ता, भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय पेन्शन योजना, रजा प्रवास भत्ता, वैद्यकीय लाभ आणि इतर बँकिंग लाभ यासह विविध फायदे देखील मिळतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.