UPSC Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

UPSC Calendar 2023: 28 मे रोजी पूर्व अन् 19 फेब्रुवारीला होणार IES परिक्षा

जाहीर केलेल्या कॅलेंडरनुसार युपीएससीची पूर्वपरिक्षा 28 मे ला आयोजित करण्यात येणार आहे.

दत्ता लवांडे

UPSC Calendar 2023 Released: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी (UPSC) परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2023 या वर्षाचे कॅलेंडर जाहीर केलं आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेलं कॅलेंडर आपल्याला पाहायला मिळणार आहे.

जाहीर केलेल्या कॅलेंडरनुसार युपीएससीची पूर्वपरिक्षा 28 मे 2023 ला आयोजित करण्यात येणार असून त्यासंदर्भातील सूचना 1 फेब्रुवारी 2023 ला देण्यात येणार आहेत. तसेच या परिक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 21 फेब्रुवारी 2023 असणार आहे. दरम्यान या वेळापत्रकात बदल करण्यात येऊ शकतात कारण मागच्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता असा खुलासाही करण्यात आला आहे. यासंबंधित सूचना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत.

यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या इंजिनिअरिंग सर्विसच्या पूर्व परिक्षासंदर्भात 14 सप्टेंबर 2022 ला सूचना देण्यात येणार असून 4 ऑक्टोबर 2022 रोजी यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. तसेच 19 फेब्रुवारीला या परिक्षा होणार आहेत असं या वेळापत्रकानुसार माहिती मिळत आहे. तसेच आयोगाच्या सूचानांनुसार Combined Geo-Scientist Preliminary Exam ह्या 19 फेब्रुवारी 2013 ला घेण्यात येणार आहेत. त्यासाठी 21 सप्टेंबरला प्रवेश अर्जाला सुरूवात होणार असून 11 ऑक्टोबरला अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

वेळापत्रक कसे बघायचे?

  • UPSC ची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in यावर क्लिक करा

  • 'परिक्षा' टॅबला क्लिक करा

  • कॅलेंडर टॅबला क्लिक करा, त्यानंतर नवीन पेज ओपन होईल

  • कॅलेंजर 2013 च्या सूचनेच्या लिंकवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला वेळापत्रकाची PDF फाईल मिळेल. तीला डाऊनलोड करुन परिक्षांच्या तारखा आणि वेळा चेक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT