Madhopatti village upsc success story
Madhopatti village upsc success story  esakal
एज्युकेशन जॉब्स

'या' छोट्याशा गावानं देशाला दिलेत तब्बल 47 IAS, IPS अधिकारी

सकाळ डिजिटल टीम

UPSC म्हणजेच, नागरी सेवा परीक्षा.. ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

Officer's Village In India : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) जौनपूरमधील 'माधोपट्टी' (Madhopatti) या छोट्याशा गावानं यशाचं एक नवं कोरं पुस्तक लिहिलंय. या गावातील 75 कुटुंबांनी 47 नागरी सेवा अधिकारी देशाला दिले आहेत. दिल्लीसारखी महानगरं नागरी सेवा परीक्षांसाठी प्रसिद्ध असताना, माधोपट्टी हे छोटसं गाव दिल्लीला टक्कर देताना दिसतंय. UPSC म्हणजेच, नागरी सेवा परीक्षा.. ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवार रात्रंदिवस मेहनत करत असतात. ही अशी परीक्षा आहे, जिथं उमेदवाराचं लेखन आणि व्यक्तिमत्व या दोन्हींची चाचणी घेतली जाते. अशा स्थितीत योग्य दिशेनं नियोजन आणि तयारी आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवार अनेकदा कोचिंग सेंटरशी संपर्क साधतात; पण कोचिंगच्या मदतीशिवाय माधोपट्टी गावातील तरुणांनी नागरी सेवा परीक्षेत आपला झेंडा फडकवलाय.

लखनऊजवळील माधोपट्टी या छोट्याशा गावानं देशाला अनेक आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) अधिकारी दिले आहेत. माधोपट्टीच्या होतकरू विद्यार्थ्यांचं यश केवळ नागरी सेवेपुरतेच मर्यादित नाही, तर इस्रो (ISRO) आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातही या गावचे तरुण आपली सेवा बजावत आहेत. गावातील विद्यार्थ्यांचा अधिकारी होण्याचा प्रवास 1914 मध्ये सुरू झाला. 1914 मध्ये मुस्तफा हुसेन (Mustafa Hussein) यांच्या रूपानं पहिला आयएएस अधिकारी होण्याचा मान माधोपट्टीला मिळाला. त्यानंतर आजतागायत माधोपट्टी गावानं एकूण 47 अधिकारी देशाला दिलेत.

1951 मध्ये द्वितीय UPSC अधिकारी : इंदू प्रकाश यांनी 1951 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि IFS पद मिळवलं. त्यांनी 'द्वितीय' टॉपर होण्याचा मान मिळवला.

1953 मध्ये तिसरा अधिकारी : 1953 मध्ये माधोपट्टी येथील विद्या प्रकाश आणि विनय प्रकाश यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळविलं आणि आयएएस पद स्वीकारलं.

1964 मध्ये पुन्हा UPSC अधिकारी : 1964 मध्ये अजय आणि छत्रपाल यांनी UPSC मध्ये यश मिळवून गावाचा गौरव केला.

प्रशिक्षणाशिवाय कठोर परिश्रमानं मिळवलं यश

माधोपट्टीच्या यशस्वी उमेदवारांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या गावात दूरवर एकही कोचिंग सेंटर नाही, तरीही विद्यार्थ्यांच्या निष्ठेनं आणि मेहनतीमुळं सर्व काही अगदी सोपं झालंय. देशातील सर्वात कठीण परीक्षेत त्यांना स्थान मिळालंय. UPSC तयारी आणि त्याच्या प्रवासात कोचिंग हा एक महत्त्वाचा घटक मानला जात असताना, माधोपट्टीनं हा विश्वास पूर्णपणे खोटा ठरवलाय. कोचिंगशिवाय, गावात वीज नसतानाही गाव अधिकाऱ्यांनी उजळून निघालंय. अधिकार्‍यांच्या रूपानं हे गाव पुन्हा प्रकाशझोतात आलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT