Women's Day
Women's Day  google
एज्युकेशन जॉब्स

Women's Day : या क्षेत्रांत आहेत महिलांसाठी करिअरच्या उत्तम संधी

नमिता धुरी

मुंबई : खरंतर, कोणतीही नोकरी लिंग-विशिष्ट नसते. सर्व नोकऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर आणि सामर्थ्यावर अवलंबून असतात. परंतु काही नोकऱ्यांमध्ये असे निकष असतात, जे महिलांसाठी अधिक योग्य असतात.

आजकाल सर्वजण सरकारी नोकरीच्या मागे धावत आहेत, पण महिलांनी काही विशेष क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.

जेव्हा तुम्ही सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करता तेव्हा अशा काही गोष्टी असतात, ज्या सर्व प्रकारांमध्ये दिसून येतात. लॉजिकल रिजनिंग, अॅनालिटिकल अशा गोष्टींचा अभ्यास केल्यास परीक्षा देणे सोपे जाईल.

आता पाहू या की या परीक्षांच्या बळावर तुम्ही कोणकोणत्या क्षेत्रांत काम करू शकता. हेही वाचा - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

बँकिंग

बँकांच्या नोकऱ्यांना महिलांमध्ये सर्वाधिक पसंती आहे. चांगला पगार, भरपूर रजा, कामाचे निश्चित तास आणि बरेच फायदे यात मिळतात. या क्षेत्रात स्थिरता आणि सुरक्षितता असते.

बँकिंग कार्मचारी निवड संस्था (IBPS) शेकडो रिक्त पदांची भरती करण्यासाठी आणि बँकांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी दरवर्षी संवर्गनिहाय विविध परीक्षा घेते. दरवर्षी, अनेक महिला या परीक्षांसाठी अर्ज करतात आणि भरती प्रक्रियेद्वारे निवडल्या जातात.

एसएससी नोकऱ्या

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दरवर्षी आयकर, CBI, कस्टम्स, एक्साईज आणि अधिक विभागांमध्ये केंद्र सरकारच्या अंतर्गत विविध पदांसाठी एकत्रित पदवी स्तर (CGL) परीक्षा आयोजित करते.

या नोकऱ्यांबद्दलचा मोठा फायदा म्हणजे त्यांच्या कामात स्थिरता आहे. 10+2 पात्रता असलेल्या महिलांसाठी SSC CHSL ही सर्वोत्तम नोकरी मानली जाते.

अध्यापन क्षेत्र

केंद्र सरकार दरवर्षी सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उमेदवारांचे मूल्यांकन आणि नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा घेते. काही राज्ये त्यासाठी राज्यस्तरीय परीक्षाही घेतात.

अध्यापनाच्या नोकरीचा एक मोठा फायदा म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी. या काळात एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकते.

अंगणवाडी नोकऱ्या

तुम्ही १२वी पास असाल आणि तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल, तुम्हाला आरोग्यासंबंधी थोडेसे ज्ञान असेल, तर तुम्ही अंगणवाडी मदतनीसची नोकरी करू शकता. यामध्ये तुम्हाला प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत एकत्र काम करावे लागेल.

आरोग्य आणि पोषणाची सर्व माहिती खेड्यापाड्यातील आणि लहान शहरातील महिलांना द्यावी लागेल. त्यात काम करताना जसा अनुभव मिळतो तसा तुमचा दर्जाही वाढत जातो. यामध्ये पगाराची व्याप्तीही चांगली आहे.

संरक्षण क्षेत्र

AFCAT, भारतीय लष्कर आणि भारतीय नौदल अविवाहित महिला पदवीधर उमेदवारांना अधिकारी म्हणून भरती करतात. महिला NCC कॅडेट्स देखील त्यांचे NCC प्रमाणपत्र वापरू शकतात आणि भारतीय सशस्त्र दलात विशेष प्रवेशासाठी तयार होऊ शकतात.

सीमा असो, लॉजिस्टिक असो, शिक्षण असो, नौदल असो वा हवाई दल असो, लष्कराच्या प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत. अवघड जॉब्स म्हटल्या जाणाऱ्या या पर्यायांची निवड तर त्यांनी केलीच पण आपली क्षमताही सिद्ध केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT