BJP supporters celebrate municipal election victory as the ‘Rasmalai’ trend targets Raj Thackeray across social media platforms.

 

esakal

Election News

BJP Victory and Rasmalai trend : भाजपने जिंकली महापालिकांची लढाई अन् सोशल मीडायवर ट्रेंड होतेय 'रसमलाई'

Rasmalai' trends on social media : जाणून घ्या, नेमकं काय कारण? भाजप खासदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावलाय टोला

Mayur Ratnaparkhe

BJP municipal victory sparks Rasmalai trend targeting Raj Thackeray : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एवढंच नाहीतर मुंबई महापालिकेतही भाजप अन् एकनाथ शिंदे यांच्या महायुतीची सत्ता येत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर जवळपास २५ महापालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीच् महापौर राहणार आहे. दुसरीकडे भाजपच्या जबरदस्त विजयानंतर सोशली मीडियावर रसमलाई ट्रेंड होताना दिसत आहे. 

खरंतर, निवडणूक प्रचारादरम्यान तामिळनाडूचे भाजप नेते अन्नामलाई आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीतून हा ट्रेंड निर्माण झाल्याचे दिसत आहे. भाजप खासदार पीसी मोहन आणि तेजस्वी सूर्या यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

तामिळनाडूमधील भाजपचे नेते अन्नामलाई मुंबईबाबत म्हणाले होते की, हे शहर केवळ महाराष्ट्राचे नाही तर ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. यानंतर राज ठाकरे यांनी अन्नामलाई यांना 'रसमलाई' असे संबोधून त्यांची खिल्ली उडवली होती. मनसे प्रमुख म्हणाले होते, "तामिळनाडूतील एक रसमलई मुंबईत आली आहे. तुमचा इथे काय संबंध आहे? हटाओ लुंगी, बजाओ पुंगी." अन्नामलाई यांनी यास तामिळ लोकांचा अपमान म्हटले होते.

शिवाय मनसे पदाधिकाऱ्यांनी अन्नामलाई मुंबईत आल्यास त्यांचे पाय कापून टाकण्याचीही धमकी दिली होती. त्यानंतर अन्नामलाई यांनी उपहासात्मक टिप्पणी केली की, केवळ त्यांचा अपमान करण्यासाठी विशेष मेळावे आयोजित केले जात आहेत, जे त्यांचे वाढते महत्त्व दर्शवते. तसेच त्यांनी आव्हान दिले की, "मी मुंबईत येईन. माझे पाय कापून दाखवा."

याशिवाय, अन्नामलाई म्हणाले होते की, के. कामराज सारख्या नेत्यांचे कौतुक केल्याने त्यांची तमिळ ओळख कमी होत नाही, ज्याप्रमाणे मुंबईला जागतिक दर्जाचे शहर म्हणणे महाराष्ट्राच्या लोकांची जागतिक दर्जाचे शहर बनवण्यात भूमिका नाकारत नाही.

दरम्यान आता बंगळुरू सेंट्रलचे भाजप खासदार पीसी मोहन यांनी एक्स वर रसमलाईचे फोटो शेअर केले आणि लिहिले, "काही रसमलाई ऑर्डर केल्या आहेत. #BMCResults." तर बंगळुरू दक्षिणचे भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनीही एक्सवर पोस्ट केली आणि म्हटले, "बीएमसी निवडणुकीत मुंबई भाजपचा गोड रसमलाई विजय."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT