Ladli Behna Yojana
Ladli Behna Yojana  
Election News

Ladli Behna Yojana : ‘लाडली बहना’ने तारले पण भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण?

नरेश हाळणोर, राजेश चरपे

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून भाजप-काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमधील लढत होती. ही लढत ‘जोरदार’ होणार, असे भाकीत असताना भाजपला ऐनवेळी मध्य प्रदेशातील ‘लाडली बहना’ने अक्षरश: तारून नेले आहे. इतकेच नव्हे, तर जे प्रांत काँग्रेसचे मजबूत मानले जात होत, त्याही ठिकाणी भाजपचे कमळ फुलले आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. परिणामी, भाजपने मध्य प्रदेशात मोठ्या संख्येने विजयाच्या दिशेने आगेकूच केली.

मध्य प्रदेशमध्ये दिवाळीच्या धामधुमीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली होती. काँग्रेसने कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार लढत दिली. विकासकामांसह जुनी पेन्शन योजना, ५०० रुपयात गॅस सिलिंडर, महिलांसाठी योजनांसह रोजगाराचे आश्वासन दिले होते. परंतु, भाजपने ऐनवेळी ‘लाडली बहना’ ही योजना राज्यात आणली आणि तत्काळ तिची अंमलबजावणीही केली. परिणामी राज्यातील महिला मतदार मोठ्या संख्येने आपल्या बाजूने वळविण्यात भाजप यशस्वी झाला. केंद्रीय नेतृत्वाने प्रचारात राज्यात विकासकामांसह गांधी घराणे आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला लक्ष्य केले असले तरी ‘मोदी है तो मुमकीन है’ या नाऱ्यासह मैदानात उतरलेल्या भाजपला ‘लाडली बहना’ योजनेने विजयाच्याही पलिकडे नेऊन ठेवले आहे.

काँग्रेससाठी अनपेक्षित

मध्य प्रदेश विधानसभेचा निकाल काँग्रेस पक्षासाठी अनपेक्षित आहे. सर्वसामान्य मतदारांमध्ये कमलनाथ यांच्याविषयी सहानुभूतीपेक्षा विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याविषयी प्रचंड नाराजी प्रचारादरम्यान दिसून आली होती. काँग्रेसचे बालेकिल्ला असलेल्या निमाड, मावाळ, विंध्य, चंबळ आणि महाकौशल्यच्या काही भागात काँग्रेसचे मताधिक्य घटले आहे. तर भाजपच्या या बालेकिल्ल्यात मुसंडी मारल्याचे या निवडणुकीतून दिसून येत आहे. परिणामी, काँग्रेसच्या जागा घटल्या आहेत. त्याचप्रमाणे, काँग्रेसने २०१८ मध्ये विजय नोंदविलेल्या जागाही यावेळी राखता आलेल्या नाहीत. भोपाळ दक्षिणमधून दोनवेळा विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार पी.सी. शर्मा तर, इंदूर एकमधून काँग्रेसचे संजय शुक्ला हे पराभूत झाले आहेत. या जागाही काँग्रेसला राखता आलेल्या नाहीत. मध्य भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रांतात नेहमीपेक्षा भाजप जास्त जागा जिंकत आहे. तर, ग्वाल्हेर-चंबळ प्रांतातही काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. भाजपने पाचही प्रांतांमध्ये मुसंडी मारत काँग्रेसला वर्चस्वाची संधी दिली नाही.

‘लाडली बहना’ प्रचाराचा मुद्दा

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये सुमारे २ कोटी ९० लाख पुरुष मतदार आहेत, तर २ कोटी ८० लाख महिला मतदार आहेत. हीच बाब हेरून भाजपने ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडली बहना ही योजना अमलात आणून महिलांच्या बँक खात्यावर १५०० रुपये जमा केले. त्याचवेळी भाजपने प्रचारादरम्यान सत्तेत काँग्रेस सरकार आल्यास ही योजना बंद करणार, असाही प्रचार केला होता. परिणामी, महिला मतदार यावेळी भाजपसाठी महत्त्वाचा ‘फॅक्टर’ राहिल्याचे मानले जाते.

मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण?

राज्यात यावेळी प्रथमच भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा जाहीर न करता विधानसभेची निवडणूक लढविली आणि जिंकलीही. ‘लाडली बहना’ योजनेमुळे विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान भाव खाऊन जात असले तरी त्यांच्याविषयी जशी राज्यात नाराजी आहे, तशीच भाजपांतर्गतही आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा दावेदार कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह ७ खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यापैकी निवास मतदारसंघातील उमेदवार व मंत्री फग्गनसिंह कुलस्ते हे काँग्रेसकडून पराभूत झाले. त्यामुळे नरेंद्र सिंह तोमर, कैलास विजयवर्गीय, विश्वास सारंग ही नावे चर्चेत असली तरी ऐनवेळी ज्योतिरादित्य शिंदे यांचेही नाव समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रमुख विजयी

शिवराजसिंह चौहान, भाजप (बुधनी)

कैलास विजयवर्गीय, भाजप (इंदूर-१)

कमलनाथ, काँग्रेस (छिंदवाडा)

नरेंद्रसिंह तोमर, भाजप (दिमाणी)

प्रल्हाद पटेल, भाजप (नरसिंगपूर)

प्रमुख पराभूत

फग्गनसिंह कुलस्ते, भाजप (निवास)

गणेशसिंह, भाजप (सटाणा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT