Datta Jayanti Upvas Thali esakal
फूड

Datta Jayanti Upvas Thali : दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त बनवा खास उपवसाची हटके थाळी

दत्त जयंतीचा उत्सव सगळीकडे खूप जल्लोषात साजरा होतो

सकाळ डिजिटल टीम

Datta Jayanti Upvas Thali : दत्त जयंतीचा उत्सव सगळीकडे खूप जल्लोषात साजरा होतो आहे. असं म्हणतात की या दिवशी दत्त पर्व इतर वेळेपेक्षा 1000 पट जास्त असते; त्यामुळे यादिवशी अनेक लोक दत्त जयंतीचा उपवास धरतात; शिवाय त्या आधी परायणालाही बसतात, अनेक जण दत्ताच्या वेगवेगळ्या ठाण्याला भेट देतात.

तुम्हीही दत्त जयंतीचा उपवास करत असाल तर या उपवासला बनवा खास उपासाची हटके थाळी.

1. बटाट्याचा शिरा

सामग्री:

2-3 उकडलेले बटाटे

½ वाटी साखर

2 टेबलस्पून तूप

आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट

कृती:

गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तूप टाका. गॅस मंद आचेवर ठेवा. तूप गरम झाल की त्यात बटाटा मँश करून टाका.

बटाटा तूपात चांगला परतून घ्या. बटाटा थोडा गोल्डन लाल होत आला की त्यात साखर टाका.

साखर मिक्स करून झाली की मग त्यात ड्रायफ्रूट टाका व गरम गरम सर्व्ह करा.

2. भगरीचा डोसा

1-1.5 वाटी भगर

1/2 वाटी साबुदाणा

1/4 वाटी शेंगदाणे

1 बटाटा

चवीनुसार उपवासाचे मीठ

आवश्यकतेनुसार पाणी

1-2 टेबलस्पून तेल

कृती:

सर्वात आधी भगर आणि साबुदाणा पाच ते सहा तास भिजत घाला.

पाच ते सहा तासानंतर भिजलेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट एका भांड्यात किंवा बाऊलमध्ये काढून घ्या.

भगरीचे पाणी काढून घ्या आणि भगर सुद्धा बारीक करून घ्या.

मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, कच्चे सोललेले बटाटे घेऊन बारीक पेस्ट करून घ्यावी.

सगळ्या पेस्ट एकत्र मिक्स करून घ्या आणि त्यात चवीनुसार मीठ घाला. त्याचे डोसासारखे बॅटर बनवून घ्या.

हे मिश्रण दहा मिनिटे बाजूला ठेवून द्या.

तवा गॅस वर ठेवून तेल पसरवून छान डोसे करून घ्या.

तुम्ही डोसा नारळाच्या चटणी सोबत किंवा दहया सोबत सर्व्ह करू शकतात.

3. मठ्ठा

6 वाटी घुसळलेलं ताक

3 मिरच्या, थोडंसं आलं आणि थोडीशी कोथिंबीर यांची पेस्ट

2 चमचे साजूक तूप

1/2 चमचा जीरे

चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर

कृती :

घुसळलेल्या ताकामध्ये मीठ साखर थोडीशी कोथिंबीर घालून ठेवा.

छोटं कढलं घेऊन त्यामध्ये तूप टाका तूप गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि केलेली पेस्ट घालून छान परतवा आणि ताकात टाका.

मठ्ठा व्यवस्थित घुसळून घ्या आणि थंड व्हायला फ्रिजमध्ये ठेवून द्या.

4. तोंडी लावण्याचे पदार्थ

तुम्ही या थाळीत तोंडी लावायला वाळवणाचे पापड, चकली आणि लिंबाच लोणचंही ठेवू शकतात.

5. फळे

वेगवेगळी फळं सुद्धा चिरून तुम्ही थाळीत ठेवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT