Sweet potato sheera Esakal
फूड

Sweet potato sheera : पौष्टिक असणाऱ्या रताळ्याचा शिरा कसा तयार करायचा ?

रताळ्यांमध्ये तंतुमय मेद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सावकाश पद्धतीने सुरू राहून लवकर भूक लागत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते.

सकाळ डिजिटल टीम

रताळे (Sweet potato) खाण्याचे आरोग्यदायी फायदे : रताळे यामध्ये कॅन्सरशी लढणारे घटक असल्याचे अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे. यातील प्रोटिझ इनहिबिटर हे प्रथिने कॅन्सर पेशींच्या वाढीला थांबवण्याची क्षमता या प्रथिनेमध्ये असल्याचे वैज्ञानिकांना आढळले आहे. रताळ्यांमध्ये तंतुमय मेद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सावकाश पद्धतीने सुरू राहून लवकर भूक लागत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते.

रताळेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व अ असते. आपले डोळे आणि त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी हे महत्वाचे जीवनसत्व असल्याने आजारपणही जास्त उद्भवत नाही. रताळ्याच्या केशरी आवरणामध्ये बिटा केरोटिन हे अँटिऑक्सिडंट असते. त्यामुळे कॅन्सर तसंच डोळ्यांच्या आजारांचा धोका टळतो. यातील जीवनसत्व क खाणाऱ्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तर, पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासह कॅल्शिअममुळे हाडांना मजबुती मिळते.

चला तर मग या बहूगुणी पौष्टिक असणाऱ्या रताळ्याचा शिरा कसा तयार करायचा ?

साहित्य :

1) दोन वाटी किसलेलं रताळं

2) दोन वाटी दूध

3) दोन चमचे साजूक तूप

4) चवीनुसार साखर

5) वेलची पूड,

6) दोन चमचे ताजा खोवलेला नारळ

7) काजू- बदामाचे बारीक काप

8) केशर

कृती :

सर्वप्रथम रताळ स्वच्छ पाण्याने धूवून निट पुसून घ्यावे. नंतर शिलणीने सोलून आणि कसणीवर बारीक किसून घ्यावे. (रताळं किसायला जर तुम्हाला वेळ नसेल तर ते रताळं उकडून मग कुस्करून घेतलं तरीही चालेल)

तोपर्यंत एका कढईत तूप गरम करायला ठेवावं, तुप गरम झाल की, यात बारीक किसलेलं रताळं घालून नीट परतून घ्यावं.

मिश्रणाचा रंग जरा बदला की, त्यात दूध घालावं आणि त्याला एक चांगली उकळी येऊ द्यावी.

उकळी आल्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार साखर घालावी.

आता हे मिश्रण नीट ढवळून एकत्र करून घ्यावं.आणि मंद गॅसवर दुधात रताळं नीट शिजू दयाव.

रताळं अगदी शिजत शिजत आल्यावर मग त्यात खोवलेलं खोबरं, वेलची पूड आणि काजू-बदामाचे बारीक काप आणि केशर घालावेत. त्याला एक हलकीशी वाफ आल्यावर गॅस बंद करावा.

टिप: हा रताळ्याचा शिरा कोरडा करण्यापेक्षा जरा ओलसरच करावा. ‌

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT