Morning Breakfast Recipe

 

sakal

फूड

Quick Morning Breakfast Recipe: रात्रीचं वरण शिल्लक राहिलंय? मग सकाळच्या नाश्त्याला त्याचे असे टेस्टी पराठे नक्की बनवा

Leftover Dal Paratha: रात्रीचं वरण शिल्लक राहिलंय का? मग त्याचा वापर करून बनवा झटपट, पौष्टिक आणि चविष्ट पराठा. हा पराठा नाश्त्यासाठी, डब्यासाठी आणि हलक्याफुलक्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी सगळ्यांना नक्कीच आवडेल.

Anushka Tapshalkar

Letfover Dal Paratha Recipe: नाश्त्यासाठी रोज नवीन काय बनवायचं हा प्रश्न हमखास पडतो. त्यातच रात्रीचं वरण उरलेलं असेल, तर त्याचा उपयोग करून आपण एक चविष्ट आणि झटपट पराठा तयार करू शकतो. हा पराठा बनवायला सोपा असून चवीलाही खूप भारी लागतो. चला तर मग पाहूया ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी.

साहित्य

  • शिल्लक राहिलेलं वरण

  • गव्हाचे पीठ – सुमारे १.५ कप (वरणाच्या प्रमाणानुसार समायोजन करा)

  • कांदा – १ (बारीक चिरलेला)

  • हिरव्या मिरच्या – १-२ (बारीक चिरलेल्या)

  • कोथिंबीर – थोडीशी (बारीक चिरलेली)

  • ओवा – अर्धा टीस्पून

  • मीठ, हळद, तिखट – चवीनुसार

  • तूप किंवा तेल – पराठा भाजण्यासाठी

कृती

- सर्वात आधी एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात शिल्लक वरण मिसळा.

- त्यात चिरलेला कांदा, मिरच्या, कोथिंबीर, ओवा, मीठ आणि मसाले घाला.

- सर्व साहित्य एकत्र करून मऊसर पीठ मळा. जर वरण फार पातळ असेल, तर पिठाचे प्रमाण वाढवा.

- पीठ झाकून १०-१५ मिनिटांसाठी बाजूला ठेवा.

- लहान लहान गोळे करून लाटून पराठ्याचा आकार द्या.

- गरम तव्यावर पराठा दोन्ही बाजूंनी भाजा. त्यावर तूप किंवा तेल घालून कुरकुरीत आणि सोनेरी शिजवा.

- तयार पराठा दही, लोणचं किंवा सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT