Masala Save Tips  esakal
फूड

Masala Save Tips : मसाले जास्त काळ टिकत नाहीत? या टीप्स फॉलो करा, मसाले तुमची साथ कधीच सोडणार नाहीत

हिवाळ्यात आद्रता आणि गारठ्यामूळे मसाले खराब होण्याची भीती

सकाळ डिजिटल टीम

Masala Save Tips : हिवाळ्यात आद्रता आणि गारठ्यामूळे मसाले खराब होण्याची भीती असते. त्यामूळे त्यांना सुरक्षित ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण ते एकदा खराब झाले की, नंतर वापरता येत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात तूमचे लाडके मसाले सुरक्षित ठेवण्याच्या टिप्स सांगणार आहोत.

जेवणाला मसाल्याशिवाय चव नाही. मसाले जर दीर्घकाळ टिकवायचे असतील तर काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. अनेक प्रकारचे मसाले असले तरी काही मसालेतरी वापरले जातात. ते नेहमीच्या जेवणात वापरले जात नाहीत, त्यामुळे वापरात नसलेले मसाले खराब होण्याची शक्यताही असते. त्यामूळे मसाले अधिक काळ सुरक्षित कसे ठेवावे हे पाहूयात

मसाले फ्रिजमध्ये ठेवणे योग्य?

फ्रीजमध्ये तुम्ही जे काही ठेवता ते खराब होत नाही आणि ते तुम्ही बरेच दिवस वापरू शकता. पण मसाल्यांसोबत असे करणे योग्य नाही. मसाले फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची चव नष्ट होते. केवळ चोथा शिल्लक राहतो. त्यामूळे मसाले फ्रीजमध्ये ठेऊ नका.

बंद डब्यात ठेवा मसाले

मसाले जर ओले झाले तर ते लवकर खराब होतात. त्यामुळे मसाल्यांना ओलावा लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. त्यासाठी हवा बंद डब्याचा वापर करा. आणि मसाले जर जास्त दिवस हवा बंद डब्यात ठेवत असाल तरही ते खराब होऊ शकतात.

काचेच्या डब्यांचा वापर करा

मसाले काय अनेक जण वापरत असतात, पण त्या ठेवण्याच्या पद्धतीही अनेकांच्या एक सारख्याच आहेत. प्लास्टीक डबा किंवा स्टीलच्या डब्यात ठेवले जातात, मात्र पावसाळ्याच्या दिवसात काचेच्या डब्यात मसाले ठेवाल तर ते अधिक काळ फ्रेश राहतील.

मसाले गरम करा

मसाल्यांमध्येही अनेक प्रकार असतात, खडा मसाला हाही त्यातीलच एक प्रकार त्यामुळे ते खराब होऊ नये असे वाटत असेल तर मसाल्यांना गरम करा आणि ठेवा. त्यामुळे मसाल्यांना बुरशी आणि किडही लागत नाही आणि त्याचा स्वादही चांगला राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT