Oats Poha Recipe  sakal
फूड

Oats Poha Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट ओट्स पोहे, जाणून घ्या 'ही' सोपी रेसिपी

Oats Poha Recipe For Breakfast: सकाळी कामावर जायला उशीर होत आहे ? पण नाश्ताही करायचा आहे? मग ही काही मिनिटातच तयार होणारी ओटस पोह्याची रेसिपी लिहून घ्या.

Anushka Tapshalkar

Oats Poha Recipe: तुम्हाला सुद्धा सकाळी नाश्त्याला काही चविष्ट आणि पौष्टिक खावेसे वाटते? मग तुमच्यासाठी आम्ही अशीच एक सोपी आणि सहज येणारी एक रेसिपी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे ओट्स पोहे. ही आरोग्यासाठी फायदेशीर पण चवीला अतिशय उत्तम रेसिपी आहे. तुम्हाला जर स्जकली उशीर होत असेल आणि झटपट काही पौष्टिक बनवायचे असेल तर खाली दिलेला ओट्स पोह्यांचे साहित्य आणि कृती नक्की लिहून घ्या.

साहित्य

ओटस

बारीक चिरलेला कांदा

वाटाणा

खिसलेलं गाजर

बारीक चिरलेली हिरवी मिरची

खिसलेलं आलं

जिरे

मोहरी

कडीपत्ता

हळद

धणेपूड

लाल मिरची पावडर

मीठ

लिंबाचा रस

बारीक चिरलेली कोथिंबीर

तेल

कृती

ओट्स पोहे बनवण्यासाठी सर्वात आधी ओटस 15-20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा जेणेकरून ते मऊ होतील. नंतर पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे आणि मोहरी टाकून नंतर कडीपत्ता घाला व फोडणी तयार करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, वाटाणा, खिसलेलं गाजर, आणि आलं घालून चांगला परतून घ्या.

आता त्यात हळद, धणेपूड, लाला मिरची पावडर आणि चवीला मीठ घालून छान एकजीव करा. यानंतर भिजवलेल्या ओट्सचं पाणी काढून ते पॅनमध्ये व्यवस्थित हलवा.

पॅनवर आता झाकण ठेवून २-३ मिनिटे माध्यम आचेवर शिजवा. परंतु मधून मधून ते पोहे नीट हलवून घ्या. आता गॅस बंद करा आणि पोह्यांवर बैरक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा आणि पुन्हा पोहे नीट मिक्स करा. तुमचे ओटस पोहे तयार आहेत. आता हे गरमगरम पोहे लिंबू पिळून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT