red wine 
फूड

Red Wine रोज प्यायल्याने शरीरावर होतात पाच परिणाम

यासंदर्भात विविध अभ्यास करण्यात आले आहेत

सकाळ डिजिटल टीम

कुठलेही सेलिब्रेशन करायचे असेल तर अगदी आवडीने रेड वाईन प्यायली जाते. किंबहुना ते आजच्या काळातील पेय (Drink) आहे. अनेक लोकांना ही वाईन पिणे अतिशय आवडते. काहींच्या मते, दोन ते तीन ग्लास वाइन पिणे हृदयासाठी (Heart) चांगले असते. वाईनमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे त्याचा हृदयाला फायदा होतोच शिवाय व्यक्ती दिर्घायुषी (Healthy) होण्यासाठी कारणीभूतही असते. याशिवाय कामावरून आल्यानंतर थकवा दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं वाईन पितात. पण अशी रोज वाईन प्यायल्याने शरीराला नुकसान होऊ शकते. तुमच्या शरीरावर पाच परिणाम होऊ शकतात.

breast cancer.jpg

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका (Breast Cancer Problem)

वाईनमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म कर्करोगाचा धोका कमी करतात. पण, 2006 मध्ये अॅनाल्स ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, वाइनमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असे म्हटले आहे. या अभ्यासानुसार, दररोज दोन ते तीन ग्लास वाईन प्यायल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका 30 ते 50 टक्क्यांनी वाढू शकतो. याशिवाय ज्या लोकांना कौटुंबिक इतिहासात यापूर्वी स्तनाच्या कर्करोगाची समस्या होती. त्यांच्यासाठी हा धोका अधिक असल्याचे म्हटले आहे.

heart attack

हृदयविकाराची समस्या (Heart Problem)

वाईन ही हृदयरोगांपासून संरक्षण करते, असे म्हटले जाते. पण, 2021 मध्ये झालेल्या एका अभ्यासात ही गोष्ट पूर्णपणे चुकीची असल्याचे सिद्ध होत आहे. 2021 च्या युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, वाईन दररोज प्यायल्याने हृदयविकाराचा धोका 16 टक्क्यांनी वाढू शकतो. मध्यम प्रमाणात वाइन पिल्याने रक्तदाब कमी होतो, असेही मानले जाते. पण याबाबत अजून संशोधन व्हायचे आहे.

periods

मासिक पाळीदरम्यान समस्या (Periods Problem)

पीएमएस म्हणजे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम स्त्रियांमध्ये त्यांच्या मासिक पाळीच्या दरम्यान किंवा त्यापूर्वी उद्भवतो. यामुळे महिलांमध्ये मूड बदलणे, चिंता आणि चिडचिड सुरू होते. अशा परिस्थितीत, वाइन प्यायल्याने हलके वाटत नाही. उलट त्याचा मासिक पाळीवरही परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही तर आतड्यात जळजळ आणि हार्मोनल रचनेत बदल होऊ शकतो.

skin problem

सोरायसिसचा धोका (PSORIASIS)

नियमित मद्यपान केल्याने यकृताचे खूप नुकसान होते. अल्कोहोलयुक्त फॅटी लिव्हरची स्थिती सर्वप्रथम अल्कोहोलच्या सेवनामुळे उद्भवते. त्यानंतर उपचार न केल्यास त्याचे रूपांतर सोरायसिसमध्ये होते. यामुळे यकृतालाही नुकसान होते. युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ लिव्हरमध्ये 2015 साली अभ्यास प्रकाशित झाला होता. या अभ्यासानुसार, अल्कोहोलचे विशिष्ट प्रमाणात सेवन केल्याने सिरोसिसचा धोका 11.13 टक्क्यांनी वाढू शकतो.

sleep

झोपेच्या समस्या (sleeping problem)

योग्य झोप न मिळाल्याने चिडचिड, खराब उत्पादकता, चिडचिड आणि कमी इंसुलिन संवेदनशीलता अशासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, झोपेचा थेट संबंध मद्याशी जोडला जाऊ शकतो. ते या सर्व समस्यांचे मूळ असू शकते. तुम्ही अल्कोहोलचे सेवन केल्‍याने झोपेचा त्रास सुरू होतो. त्यामुळे खूप झोपल्यानंतरही थकवा जाणवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manmad News : मनमाड कृषी बाजार समितीतील अविश्वास ठराव फेटाळला; दीपक गोगड यांना दिलासा

Pimpri-Chinchwad Update : सायकल चालवा; कोंडी फोडा, प्रदूषण हटवा! ‘स्मार्ट सिटी’त पालिकेकडून ‘स्टार्ट अप’ने मुहूर्तमेढ

Punawale Traffic Jam : ‘एमएनजीएल’ वाहिनी फुटून वायुगळती, हजारो ग्राहकांना फटका; पुनावळे भुयारी मार्गाजवळ तीन तास कोंडी

ICICI Bank: बँकेची मोठी घोषणा... आता खात्यात 10,000 रुपयांऐवजी किमान 50,000 रुपये ठेवावे लागतील

PMC News : पांडवनगरमधील दीड हजार रहिवासी धोक्यात; महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत झाडं घरात!

SCROLL FOR NEXT