फूड

काय? गुलाबजाम भजी? आता हेच खायचं बाकी राहिलं होतं!

सध्या गुलाबजाम भजीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

कित्येक वर्षांपासून गुलाबजाम हे भारतातील प्रसिद्ध गोड पदार्थ म्हणून प्रसिध्द आहे. गोलाकार, तळलेला, साखरेच्या पाकामध्ये बूडवलेला खव्याचा गोळा...म्हणजेच गुलाबजाम आपल्याकडे फार पुर्वीपासून तयार केला जातो. हा पदार्थ तुम्हाला मोठ-मोठ्या रेस्टॉरंट, मिठाईच्या दुकान आणि छोट्या विक्रेत्याकडे सहज मिळतो. घरच्या घरी देखील गुलाबजाम झटपट बनविता येतात. लग्नासंमारभामध्येही हा खास पदार्थ आपल्याला हमखास दिसतो.

आज काल वेगवेगळ्या पदार्थांना ट्विस्ट करून नवा पदार्थ करण्याचा टेंड सुरू आहे. यामध्ये आतापर्यत आपण ओरिओ पकोडा, फॅन्टा मॅगी असे विचित्र पदार्थ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचे तुम्ही पाहिले असेल, पण आता विचित्र पदार्थांच्या यादीमध्ये गुलाबजाम देखील दिसणार आहे. एका विक्रेत्याने गुलाबजामची भजी तयार केली आहे... होय, गुलाबजामची भजी! विश्वास बसत नसला तरी तुम्ही जे वाचताय तेच बरोबर आहे. सध्या गुलाबजाम भजीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

एका इन्स्टाग्रॅम ब्लॉगरने @delhi_tummy या अकाऊंटवर हा व्हिडिओ काही दिवासांपूर्वी अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये एक विक्रेता गुलाबजामची भजी करताना दिसत आहे. सर्वात आधी तो खूप सारे गुलाबजाम बेसनाच्या पिठामध्ये टाकतो आणि व्यवस्थित घोळून घेऊन मग गरम तेलामध्ये टाकून ते तळतो असे दिसत आहे. या विचित्र प्रयोगाची चव कशी असेल हे तुम्हाला ब्लॉगरच्या चेहऱ्यावरील भाव पाहून समजेल. खाली दिलेला व्हिडिओ पाहा

हा व्हिडिओ अपलोड झाल्यापासून इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. त्याला 4.7 दशलक्ष व्ह्यूज, 91.84K लाईक्स मिळाले असून हजारो कॉमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले, " ''तुम्ही हा गोड पदार्थ का खराब करत आहात'' (Why are you spoiling this sweet dish?)

दुसऱ्या व्यक्तीने लिहले आहे की, ''असे करू नको यार, हाथ जोडून विंनती करतो, असे करू नका, हे सर्व प्रमोट करू नका.'' (Please don't do this, I join my hands in front of you, please stop promoting things like this).

इतर काही जण म्हणाले की, ''सगळे गुलाबजाम वाया घालवले'. याउलट, काहींनी असेही म्हटले आहे की, ''याची चव खरोखर चांगली असू शकते.''

तुम्हाला या गुलाबजाम भजीबद्दल काय वाटते? तुम्हाला हा गुलाबजाम ट्राय करायाला आवडले का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

UPSC Success Story : ग्रामीण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी डॉ.भगवंत पवार यांचे UPSC CMS मध्ये ऑल इंडिया 25वी रँक!

Pune Digital Arrest : डेक्कनमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक; ७९ वर्षीय महिलेची १७ लाखांची आर्थिक हानी!

Pune Domestic Violence : हडपसर मधील घरगुती हिंसा; दोरी आणि लोखंडी गजाने पत्नीला मारण्याचा प्रयत्न!

Pune Cyber Scam : सायबर गुन्हेगारांनी पोलिस असल्याचा भास करून ज्येष्ठ नागरिकाला फसवले; बँक खात्यातून ३६ लाख रुपयांचा गंडा!

SCROLL FOR NEXT