फूड

फ्रिजमध्ये अन्न साठवताना या ५ चुका तुम्ही करता का?

सकाळ डिजिटल टीम

स्वयंपाकघरात फ्रिज हा अत्यंत महत्वाचा आहे. आपण त्यात अनेक गोष्टी साठवून ठेवत असतो. कारण रोजचा स्वयंपाक (Food) करताना आपल्याला काहीना काही फ्रिजमध्ये साठवून ठेवावे लागते. कारण स्वयंपाकघरात (Kitchen) ३६५ दिवस काहींना काही पदार्थ तयार होत असतात. आपण कच्चे पदार्थ, विविध मसाले असे एकना अनेक प्रकार फ्रिजमध्ये ठेवतो. जर अन्नपदार्थ योग्यरित्या साठवले गेले नाहीत तर समस्या निर्माण होतात. त्यामुळे फ्रिजमध्ये अन्न साठवताना खूप काळजी घेणे गरजेचं आहे. त्यामुळे या पाच गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

प्लॅस्टिक कंटेनर वापरा

अनेक लोकं प्लॅस्टिकच्या डब्यात अन्न जास्त काळ साठवून ठएवतात. प्लास्टिकमुळे आरोग्याला समस्या निर्माण होता. तरीही, आपण हाताळण्यास सोपे आणि स्वस्त असलेले कंटेनर वापरतो. अशावेळी अन्न ठेवण्यासाठी तुम्ही काचेचे किंवा स्टीलचे कंटेनर वापरून पहा.

हवाबंद कंटेनर न वापरणे

असे बरेच पदार्थ आहेत जे हवाबंद डब्याशिवाय राहू शकतात. पण, जेव्हा हवेतून ओलावा निघून जातो तेव्हा बरेच अन्न खराब होऊन वाया जाते. विशिष्ट अन्न कसे साठवायचे याकडे जरा अधिक लक्ष देणे गरजेचे ठरते. फळे आणि भाज्या कापून, बिस्किटे, नमकीन, मसाले आणि इतर असे खाद्यपदार्थ सुरक्षित राहण्यासाठी हवाबंद कंटेनरमध्ये ठेवले जाणे महत्वाचे आहे.

fridge

तापमान न पाहाणे

फ्रीजमध्ये काय ठेवावे आणि फ्रीजरमध्ये काय ठेवावे हे माहिती असणे गरजेचे आहे. जर शिजवलेले पदार्थ अनेक दिवस वापरायचे असतील तर ते फ्रीजरमध्ये अधिक काळ टिकेल. स्वीट कॉर्न, मटार आदी पदार्थ तिथेच ठेवायचे. FDA रेफ्रिजरेटरचे तापमान 40 डिग्री किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्याची शिफारस करते तर फ्रिजरचे तापमान 0 डिग्री एफ असले पाहिजे.

nonveg

गोठवलेले अन्न साठवणे

अनेकजण मोठ्या प्रमाणात मांस किंवा इतर गोठवलेले अन्न वितळतो, त्याचा काही भाग वापरतो आणि फ्रीझरमध्ये पुन्हा साठवतो. गोठलेले पदार्थ, एकदा वितळले आणि पुन्हा गोठवले गेले तर त्याची चव पुर्वीसारखी राहत नाही.

Hot Food

अन्न पुन्हा गरम करणे चुकीचे

ही चूक अनेकजण करतात. तुम्ही अनेकदा गोठवलेले अन्न मायक्रोवेव्हमध्ये वितळवता का? तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये काचेच्या डब्याऐवजी प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम करता का? तुमची चूक कुठे होतेय, ते तुम्हाला कळलं असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT