Konkan Ganeshotsav Ganpati Decoration Bullockcart Farmer Bappa esakal
Ganesh Chaturthi Festival

Konkan Ganeshotsav : बाप्पाच्या हातात आसूड अन् दोरी..; शेतकऱ्याच्या घरी साकारला बैलगाडी चालवणारा गणपती

यंदा प्रथमच बैलगाडी चालवणारा बाप्पा साकारण्याचे ठरवले.

सकाळ डिजिटल टीम

यंदा अनेक ठिकाणी चांद्रयानाची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे. विविध स्पर्धांसाठी देखावे साकारण्यावर भाविकांचा कल दिसतो.

रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी येथील विक्रम विलास मयेकर यांनी घरी बैलगाडी (Bullockcart) चालवणारा गणपती बाप्पा (Konkan Ganeshotsav) प्रतिष्ठापित केला आहे. बैलगाडीवान गणपती पाहण्यासाठी अनेक भाविक येत आहेत. यंदा अनेक ठिकाणी चांद्रयानाची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे.

यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही शेतकरी (Farmer) आहोत. त्यामुळे यंदा प्रथमच बैलगाडी चालवणारा बाप्पा साकारण्याचे ठरवले. गावातीलच मूर्तिकार सागर मुरलीधर चौगुले यांनी ही मूर्ती सुरेख साकारली. आधी बैलगाडी बनवली. त्यासाठी लोखंडी रॉड वगैरे साहित्य वापरले आहे. त्यानंतर त्यावर मातीकाम केले आहे. त्यावर बाप्पाची मूर्ती असल्यामुळे काळजी घेतली आहे.

गणेशोत्सवासाठी सर्वच घरांमध्ये बाप्पासाठी नवनवीन कल्पना वापरून सजावट केली जाते. स्वतः बनवलेले पडदे, बाजारातील विद्युत रोषणाईचे साहित्य, गावात मिळणारे कवंडल फळे, फुले, पाने यांची सजावट केली जाते. त्यासोबतच बाप्पाच्या मूर्तीसुद्धा नवनवीन प्रकारच्या बनवण्याकडे कल दिसतो.

बसलेल्या बाप्पाच्या मूर्तीसह गरुड, मयुर, राजहंस यांच्यावर आरुढ मूर्ती असतात. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे विविध ठिकाणच्या मूर्ती पाहायला मिळतात. आपल्या आवडीच्या मूर्ती निश्चित करून त्या तशाच मूर्ती हव्यात असे मूर्तीकारांना सांगितले जाते. यंदा अनेक ठिकाणी चांद्रयानाची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे. विविध स्पर्धांसाठी देखावे साकारण्यावर भाविकांचा कल दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT