Konkan Ganeshotsav Marathi Actor Prabhakar More esakal
Ganesh Chaturthi Festival

Konkan Ganeshotsav : 'बाल्या डान्स' संस्कृती जपणारा अन् कोकणचं दर्शन घडवणारा होता, पण आता..; मराठी अभिनेत्यानं व्यक्त केली खंत

गणेशोत्सवाचे संपूर्ण स्वरुपच बदलले आहे.

सकाळ डिजिटल टीम

'आपली खरी कोकणी संस्कृती, पूर्वीसारखी गणेशोत्सव परंपरा जपली पाहिजे, तरच या उत्सवाचा हेतू खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल.'

चिपळूण : तालुक्यातील वहाळ-मोरेवाडी या माझ्या गावात मी लहानाचा मोठा झालो. बालपणी आमच्या मोरेवाडीचा बाल्या डान्स होता. मी त्याचा तुरेवाला शाहीर होतो. त्यावेळचा बाल्या डान्स (Balya Dance) हा खूप बघण्यासारखा, संस्कृती जपणारा व कोकणचे दर्शन (Konkan Ganeshotsav) घडविणारा होता, असं स्पष्ट मत अभिनेते प्रभाकर मोरे यांनी व्यक्त केले.

आता मात्र त्याचे बदलते रुप पाहवत नाही, अशी खंत व्यक्त करून गणेशोत्सवातील संस्कृती बिघडवू नका, ती जपा, असे आवाहनही अभिनेते मोरे (Actor Prabhakar More) यांनी केले. मी बालपणी गावामध्ये घडलो. दहावीपर्यंत शिक्षण वहाळ हायस्कूलमध्ये, तर पुढील शिक्षण चिपळूण डीबीजे महाविद्यालयात झाले. यानंतर करिअरसाठी मुंबईची वाट धरली. असे असले तरी मी गावचा गणेशोत्सव विसरलेलो नाही. वेळात वेळ काढून मी गणपतीला येतो.

अभिनेते मोरे म्हणाले, आता गणपती आणण्याची सोय वाहनाने असली तरी मी पूर्वीपासून डोक्यावरुन गणपती घरी आणायचो. हीच खरी माझी भक्ती आहे. तेव्हा रानफुले, बांबू, झाडांची झापे, फांद्या, वेली यांपासून आम्ही गणपतीची आरास करायचो. पैसा नसला तरी अशा साधनांचा वापर करुन गणपती भोवतालची सजावट खूप छान वाटायची. पताका करणे, कागदी कंदील लावणे या माझ्या आवडीच्या गोष्टी.

आता माणसाकडे पैसा आला आणि सजावटीत बदल झाले, मात्र पूर्वीसारखी पर्यावरणपूरक आरास, सजावट करणे हीच श्री गणेशाची खरी आराधना आहे. गणेशोत्सवात हरितालिका पूजन, ऋषी पंचमी, गौरी आणणे ही मजाही काही वेगळीच. पूर्वी महिलांचे झिम्मा, फुगडी, गाणीगप्पा रात्रभर चालायच्या, असेही अभिनेत्यानं सांगितलं.

गौरी आल्या की टिपऱ्यांच्या नृत्याला अधिक बहर यायचा. आता मोबाईलच्या युगात हे फारसे पाहायला मिळत नाही. गणेशोत्सवाचे संपूर्ण स्वरुपच बदलले आहे. बदलते तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे, मात्र आपली खरी कोकणी संस्कृती, पूर्वीसारखी गणेशोत्सव परंपरा जपली पाहिजे, तरच या उत्सवाचा हेतू खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल, असं मतही अभिनेते प्रभाकर मोरे यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Election : उमेदवारीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; 'बाहेरून आलेल्यांना पायघड्या, की एकनिष्ठांना संधी?' सवाल

माझ्याकडे बंदूक नसतानाही मला... संजय दत्तने कशी काढली जेलमधली ५ वर्ष? म्हणाला, 'तुरुंगातला तो काळ अत्यंत...

Pune News: दुर्देवी घटना ! 'हुबळीनजिक अपघातात बारामतीतील दांपत्याचा मृत्यू; देवदर्शनाहून येताना काळाचा घाला, दाेन मुले गंभीर जखमी..

IND vs SA, 2nd ODI: चतुर, चालाख... दक्षिण आफ्रिकेने मोक्याच्या क्षणी DRS घेतला, रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला

ICC ODI Rankings : विराट कोहलीचे पाऊल पडते पुढे! रोहित शर्माची वाढली धाकधुक; नेमकं काय घडतंय? पाकिस्तानी बनला नंबर १

SCROLL FOR NEXT