Ganeshotsav 2022  esakal
ganesh story

Ganeshotsav 2022 : श्री गणपतीची मुर्ती घेताना या चुका करू नका

गणेशोत्सव जवळ आल्यावर लोकांची लगबग सुरू होते ती गणेश मूर्ती बूक करण्याची. पण मूर्ती घेतामा काही गोष्टींची काळजी घ्यायला ही. जाणून घेऊ त्याविषयी.

सकाळ डिजिटल टीम

गणरायाचे घरात आगमन होणार म्हणजे घरामध्ये आनंद संचारू लागतो. सर्वांना हवाहवासा वाटणारा पाहुणा येणार याचा उत्साह हा उत्सव सुरू होण्याआधीच वाहू लागतो. पण गणरायाचे प्रतिक म्हणून आणल्या जाणाऱ्या मूर्तीविषयी शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. त्याचे पालन करणे गरजेचे आहे.

काय आहेत नियम?

१) गणपतीची १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी,

२) मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे,

३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.

४) साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये,

५) शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिव पार्वतीची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे,

६) गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणूनये,

७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मध्ये देवत्व येत नाही,

तोवर ती केवळ माती समजावी. विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी,

८) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणून प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणू नये.

९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून घ्यावा, गणपती विसर्जनाची घाई करू नये,

१०) गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये,

११) गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात ६० गाड्यांना भीषण आग; ४० दुचाकी आणि २० चारचाकी गाड्या जळून खाक

Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यासाठी नाशिककरांवरच २०० कोटींचं कर्ज; महापालिकेकडून ग्रीन बॉण्ड विक्रीची घोषणा

अवकाश विज्ञान तुमच्या दारी! नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ISRO कडून सुवर्णसंधी; ‘युविका 2026’ साठी प्रक्रिया सुरू, कुठे अन कसा अर्ज कराल? वाचा सविस्तर

Farmer Success Story: वाट्याने शेत घेऊन अडीच एकरांत १२ लाखांचे खरबुजाचे उत्पादन; वांगीतील चौधरी भावंडांनी घेतले ५० टन फळ; व्यवस्थापनातून अडचणींवर मात!

IND vs SA : 'गौतम, सूर्या यांच्या दोन चुकांमुळे भारतीय संघ हरला'; द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर R Ashwin चांगलाच संतापला

SCROLL FOR NEXT