1vaccine_covid19.jpg
1vaccine_covid19.jpg 
ग्लोबल

'जगातील 20 टक्के लोकसंख्येला 2022 पर्यंत कोरोना लस मिळण्याची शक्यता कमी'

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली- ब्रिटन आणि अमेरिकेतील नागरिकांना कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर जगातील इतर देश या लशीची आतुरतेने वाट पाहत आहेत. याचदरम्यान एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार वर्ष 2022 पर्यंत जगातील पाचवा हिस्सा म्हणजे सुमारे 20 लोकांना कोरोनाच्या लशीसाठी 2022 पर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. 

जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधनानुसार, औषधाचे उत्पादन करणाऱ्या 13 प्रमुख कंपन्या आहेत. या कंपन्या पुढीलवर्षीपर्यंत जितक्या लशी बनवतील त्यातील अर्ध्याहून अधिक लशी या श्रीमंत देशांच्या ऑर्डरसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जगात श्रीमंत देशांची लोकसंख्या ही 14 टक्के आहे. या देशांनी अनेक औषध कंपन्यांच्या लशी आधीच खरेदी केल्या आहेत. 

कोरोनामुळे श्रीमंत आणि गरीब असे सर्वच देश त्रस्त आहेत. कोरोना संसर्गामुळे जगभरातील 1 कोटी 60 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान काही देशांनी कोरोना लस विकसित केली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि संयुक्त अरब अमिरातने आपल्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली आहे. गरीब देश कोरोनाची लस मिळवण्याच्या स्पर्धेत मागे पडू शकतात, असे या अभ्यासात म्हटले गेले आहे. सर्व औषध निर्माता कंपन्या सुरक्षितपणे आपले जागतिक उत्पादन लक्ष्य पूर्ण करण्यात जरी यशस्वी झाले तरी किमान जगातील 20 टक्के लोकांना 2022 पूर्वी लस मिळण्याची शक्यता कमीच आहे. 

बीएमजे मेडिकल जर्नलने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, लसीच्या उत्पादनाशी संबंधित तथ्ये आणि माहिती पाहिल्यानंतर असे लक्षात आले की, नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत कोरोनाचे एकूण 7.48 अब्ज डोसचे बुकिंग करण्यात आले आहेत. कारण लोकांना दोन डोस दिले जाणार आहेत. अंदाज आहे की, 2021 च्या अखेरपर्यंत औषध कंपन्या कमाल 5.96 अब्ज कोरोना लशीचे उत्पादन करतील. 
महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT