23-year-old crypto king kidnapped, tortured over 3 million dollar ransom  Sakal
ग्लोबल

Crypto Crime News : खंडणीसाठी 23 वर्षीय 'क्रिप्टो किंग'चं अपहरण; मारहाण करून केला छळ

पोलिस संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहेत

सकाळ डिजिटल टीम

Crypto Crime News : कॅनडामधील स्वयंघोषित "क्रिप्टो किंग" एडन प्लेटर्स्कीचे डिसेंबरमध्ये 3 दशलक्ष डॉलर खंडणी मागणाऱ्या हल्लेखोरांनी अपहरण करून त्याच्यावर अत्याचार केले होते, असे त्याच्या वडिलांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे.

प्लेटर्स्की दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरा जात आहे. कारण प्लेटर्स्कीवर गुंतवणूकदारांनी घोटाळा केल्याचा आरोप आहे. कॅनडामधील संबंधित अधिकारी सध्या लाखो रुपये वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. (23-year-old crypto king kidnapped, tortured over 3 million dollar ransom)

प्लॅटर्स्कीने गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या बहुतेक पैशांचा वापर त्याच्या वैयक्तिक सुखासाठी केला आहे. ज्यात खाजगी जेट, लक्झरी कार आणि परदेश दौरे यांचा समवेश आहे. असे CBC न्यूजने वृत्त दिले आहे. प्लेटर्स्कीने गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या 40 दशलक्ष डॉलर पैकी फक्त दोन टक्क्यांहून कमी गुंतवणूक केली आहे, असे कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

CTV न्यूज टोरंटोच्या वृत्तानुसार, त्याच्या वडिलांनी त्याच्या सुटकेनंतर त्याच महिन्यात कोर्टात सांगितले की, प्लेटर्स्कीचे डिसेंबरमध्ये मध्यरात्री टोरंटो शहरामधून अपहरण करण्यात आले आणि सुमारे तीन दिवस दक्षिण ओंटारियोच्या आसपास नेले.

प्लेटर्स्कीला अपहरणकर्त्यांनी मारहाण केली आणि छळ केला असा आरोप त्याच्या वडिलांनी केला.प्लेटर्स्कीला खंडणी म्हणून 3 दशलक्ष डॉलर मागितले, असे त्याच्या घरमालकाने सांगितले.

"एडनने एक व्यवसाय चालवत होता. त्याने लोकांना सांगितले की तो त्यांचे पैसे गुंतवेल आणि त्यांना नफा कमवून देईल पण त्याने तसे केले नाही," या प्रकरणातील विश्वस्त रॉब स्टेल्झर यांनी वृत्तवाहिनीला सांगितले.

प्लेटर्स्कीकडे 10 पेक्षा जास्त स्पोर्ट्स कार आहेत, ज्यात 1.6 दशलक्ष डॉलर मॅक्लारेन सेन्ना ही एक दुर्मिळ कर आहे. CTV न्यूज टोरंटोने न्यायालयाच्या कागदपत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT