प्रत्येकाला छोट बाळ हसावं असं वाटत तर कित्येकजण छोट्या बाळांना हसविण्याचा प्रयत्न करतात पण नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यात एका बाळाच्या हास्यावरुन पालक चिंतेत आहे. हो, दुर्मिळ जन्मजात विसंगती घेऊन जन्मलेले हे बाळ जरी सोशल मीडिया युजरच्या लाखो चेहऱ्यावर हास्य फुलवत असले तरी पालक मात्र चिंतेत आहे. (A baby born with permanent smile goes on viral on social media)
डिसेंबर 2021 मध्ये जन्मलेल्या आयला समर मुचा (Ayla Summer Mucha) हिला बायलॅटरल मायक्रोस्टोमियाचे (bilateral microstomia) निदान झाले. यामुळे ती कायम स्मित हास्य स्थितीत असते. सध्या याच कारणाने ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टार बनली आहे.
Cleft Palate-Craniofacial Journal, मधील 2007 च्या अभ्यासानुसार, जगभरात या आजाराची केवळ 14 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
तिचे पालक क्रिस्टीना वर्चर आणि ब्लेज मुचा ( Cristina Vercher and Blaize Mucha) यांना ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी माहिती दिली, क्रिस्टीना वर्चर म्हणते, ब्लेज आणि मला याबाबत कल्पना नव्हती. अशा आजाराच्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही कधीही भेटलो नाही. त्यामुळे आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता.
आयलाचे आई-वडील डॉक्टरांशी तिचे हास्य ठीक करण्यासाठी शस्त्रक्रियेबद्दल बोलत आहेत कारण यामुळे ती लाळ गिळू शकत नाही. इंस्टाग्रामवर, त्यांनी आजाराबद्दल जागरूकता पसरवली आणि त्यांचे अनुभव शेअर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.