Smears Mona Lisa Portrait With Cake sakal
ग्लोबल

व्हीलचेअरवर आला अन् फेकला केक, 'मोनालिसा'च्या ऐतिहासिक कलाकृतीवर हल्ला

मोनालिसाच्या पेंटिंगवर एका व्यक्तीनं केक फेकल्याची घटना उघडकीस आली. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड गाजतयं

सकाळ डिजिटल टीम

जगप्रसिद्ध अजरामर कलाकृती ‘मोनालिसा’ ही तीच्या गूढ प्रतिमेसाठी नावाजलेली आहे. जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा व्हिंचीची (Leonardo da Vinci) अजरामर कलाकृती पॅरिसच्या लोव्हेर म्युझियमध्ये ठेवण्यात आली आहे. दरदिवशी अनेक पर्यटक या कलाकृतीला बघण्यासाठी तेथे गर्दी करतात. अशातच रविवारी मोनालिसाच्या पेंटिंगवर एका व्यक्तीनं केक फेकल्याची घटना उघडकीस आली. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड गाजतयं.

विशेष म्हणजे व्हीलचेअरवर बसलेली ही व्यक्ती प्रत्यक्षात विग आणि लिपस्टिक लावून ज्येष्ठ महिलेच्या वेशात आली आणि चित्रावर केक फेकला आणि उठून त्या ठिकाणावरुन पळून झाली. या घटनने एकच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे या पेटिंगवर काच बसवण्यात आल्यानं थेट कलाकृतीचे कुठलेही नुकसान झाले नाही.

या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी अवघ्या काही सेंकदातच त्याला पकडले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. याआधीही या ऐतिहासिक कलाकृतीवर 1950 मध्ये ॲसिड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर त्यावर काच बसवण्यात आली. त्यानंतर सुद्धा आता या कलाकृतीवर केक फेकल्याने ऐतिहासिक कलाकृतींवरील संवेदनेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी आणि मोनालिसा प्रतिमेचे चाहते या घटनेवर निषेध व्यक्त करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन तासांचा प्रवास ३० मिनिटात, कॅशलेस तिकिट अन्...; नव्या मेट्रो मार्गांचा मुंबईकरांना फायदा, CM फडणवीस काय म्हणाले?

Banana Crisis: दर तुमच्या मनाने ठरवा; पण केळी घेऊन जा...; निर्यात ठप्पमुळे शेतकरी हतबल; झाडावरच नासताहेत केळी, विकलेल्या मालाचे पैसे मिळेनात!

'लग्नानंतर होईलच प्रेम'मधून अभिनेत्रीची एक्झिट; पोस्ट करत म्हणाली, 'प्रवास जरी संपला असला तरी....'

Latest Marathi News Live Update : नाशिकमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून 28 एप्रिलपर्यंत स्थगिती

Supreme Court : कायदे -अधिकार असूनही महिलांवर पुरुषसत्तेचं नियंत्रण अजूनही कायम; सुप्रीम कोर्टाची खंत!

SCROLL FOR NEXT