Nuclear War Sakal
ग्लोबल

रशिया अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकेल का? Research मध्ये धक्कादायक खुलासा!

रशियाने युक्रेनवर केलेल्या युद्धामुळे अमेरिकन नागरीकांना चिंता सतावते आहे

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेकांची काळजी वाढली आहे. अनेकांनी या युद्धाचा निषेध केला आहे. महत्वाचे म्हणजे या युद्धामुळे अमेरिकन नागरीकांना वेगळीच चिंता सतावते आहे. त्यांना वाटतेय की अमेरिका थेट संघर्षात सहभाही होईल. तसेच अणवस्त्रांचाही वापर केला जाईल. याबाबत नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शीतयुद्धाच्या काळातील चिंतेची पातळी वाढल्याचे दाखवले आहे. असोसिएटेड प्रेस-एनओआरसी सेंटर फॉर पब्लिक अफेयर्स रिसर्चने याबाबत सर्वेक्षण केले आहे. त्यांच्या नवीन सर्वेक्षणानुसार, जवळजवळ निम्म्या अमेरिकन लोकांना रशिया थेट अमेरिकेला अण्वस्त्रांसह लक्ष्य करेल, अशी चिंता वाटते आहे.

vladimir putin

पुतिन यांनी देशातील अण्वस्त्रांना हाय अलर्टवर ठेवले आहे

एजन्सीच्या वृत्तानुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 24 फेब्रुवारीनंतर आपल्या देशाच्या आण्विक सैन्याला लगेचच हाय अलर्टवर ठेवले आहे. त्यामुळे अंदाजे 10 पैकी 9 अमेरिकन नागरिकांना चिंता वाटत असून पुतिन युक्रेनविरूद्ध अण्वस्त्र वापरू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. रशियाने युक्रेनसोबत केलेल्या युद्धामुळे जगात कुठेही अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता वाढली आहे, असे 71 टक्के अमेरिकनांचे म्हणणे आहे.

North Korea Ballistic Missile Test

उत्तर कोरियामुळेही आहे तणाव

उत्तर कोरियाने आपल्या सर्वात मोठ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या चाचणीपूर्वी शुक्रवारी हे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात दिसून आले आहे की 51 टक्के अमेरिकन लोकांनी उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमामुळे अमेरिकेला धोका वाढल्याने आम्हाला खूप चिंता असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission News : केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! DA अन् DR मध्ये लवकरच वाढीचे संकेत

Hindu Youth Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू तरूणाला मारलं! २० दिवसांत कट्टरपंथीयांकडून सातवी हत्या

Pune Election: पुण्यात भाजपने नाराजांची काढली 'अशी' समजूत; तिकीट न मिळालेल्या इच्छूकांवर नवी जबाबदारी

MPSC Success : येरमाळ्याच्या वैभवची यशाची 'हॅट्ट्रिक'! तलाठी, एसटीआयनंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून 'पुरवठा अधिकारी' पदी झेप!

Caste Certificate Protest : मुलाला जातीचा दाखला नाकारला; अन् आईने टॉवरवर चढून १४ तास केले आंदोलन; पोलिसांच्या शिष्टाईने सुखरूप सुटका!

SCROLL FOR NEXT