Hindu Youth Brutally Killed in Bangladesh

 

esakal

ग्लोबल

Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

Real Reason behind Bangladesh Hindu Youth Murder : पोलिस आणि रॅपिड अ‍ॅक्शन बटालियनच्या तपासात ईशनिंदेचा कोणताही पुरावा आढळला नाही ; जाणून घ्या, मग काय होतं कारण?

Mayur Ratnaparkhe

Real Reason Behind the Brutal Killing in Bangladesh : बांगलादेशात जमावाने हिंदू तरुण दीपू चंद्र दास याला बेदम मारहाण करून ठार मारले आणि नंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवून जाळून टाकला. या भयानक घटनेच्या तपासात आता एक धक्कादाक नवीन वळण समोर आलय.

सुरुवातीला, हा पैगंबर मुहम्मद यांच्याविरुद्ध ईशनिंदा केल्याचा खटला असल्याचे वृत्त होते, परंतु पोलिस आणि रॅपिड अ‍ॅक्शन बटालियन (RAB) च्या तपासात या आरोपाला पुष्टी देणारे कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हत्येचे खरे कारण कारखान्यातील कामाचा वाद,  प्रोडक्शन टारगेट, जुने वैर, ओव्हरटाइम आणि अलिकडेच घेतलेली पदोन्नती परीक्षा होती.

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, २७ वर्षीय दीपू चंद्र दास हा पायोनियर निटवेअर्स (BD) लिमिटेड या कपड्याच्या कारखान्यात फ्लोअर मॅनेजर होता. त्याने अलीकडेच पर्यवेक्षक पदासाठी पदोन्नती परीक्षा दिली होती. कारखान्याचे वरिष्ठ व्यवस्थापक साकिब महमूद यांनी सांगितले की, संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काही कामगारांनी दीपूवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत कारखान्यात निषेध करण्यास सुरुवात केली.  तर दीपूचा भाऊ, अप्पू चंद्र दास यांनी सांगितले की, दीपूचे कामाच्या परिस्थिती,  टारगेट आणि कामगारांच्या फायद्यांवरून अनेक सहकाऱ्यांशी सतत वाद होत होते.

१८ डिसेंबर २०२५ रोजी वाद वाढला आणि कारखान्याच्या फ्लोअर इन्चार्जने दीपूला राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याला कारखान्यातून बाहेर काढून जमावाच्या स्वाधीन करण्यात आले. दीपूला पोलिस ठाण्यात नेले जात असल्याचा दिपूचा मित्र हिमेलने अपूला केला. परंतु काही वेळानंतर त्याला कळले की तो मरण पावला आहे. अपू घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याला त्याचा मृतदेह जळालेला आढळला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दीपूला कारखान्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या महामार्गाजवळ मारहाण करण्यात आली. त्याच्या मृत्यूनंतर, त्याचा मृतदेह झाडाला बांधण्यात आला, रॉकेल ओतण्यात आला आणि जाळण्यात आला. या घटनेचे भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये जमाव दीपूला मारहाण करत आणि त्याचा मृतदेह जाळताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai jewellery Shop Robbery video : बुरखा घालून आले अन् बंदूक दाखवत भरदिवसा 'ज्वेलरी शॉप' लुटून निघूनही गेले!

Pune land scam: बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट; तहसीलदारांचा जामीन फेटाळला, कोर्टात नेमकं काय घडलं?

Viral Video: धावत्या रिक्षात कपलचा सुरु होता रोमान्स, लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाला अन्...

Pune Municipal Election : भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पुणे महापालिका निवडणुकीत संयुक्त रणनितीची शक्यता!

Latest Marathi News Live Update : महापालिकेसाठी उमेदवार उद्यापासून सादर करणार अर्ज

SCROLL FOR NEXT