North Peru Bus Accident
North Peru Bus Accident esakal
ग्लोबल

Peru Bus Accident : 60 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला मोठा अपघात; उंच कड्यावरून कोसळून 24 जणांचा दुर्दैवी अंत

सकाळ डिजिटल टीम

पेरूच्या वाहतूक पर्यवेक्षी एजन्सीनं (SUTRAN) एका निवेदनात अपघाताची पुष्टी केलीये. परंतु, मृतांची संख्या आणि जखमींची संख्या दिलेली नाही.

पेरू : दक्षिण अमेरिका (South America) खंडात वसलेल्या पेरूमध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडलीये. उत्तर पेरूमध्ये (North Peru) 60 प्रवाशांना घेऊन जाणारी बस उंच कड्यावरून खाली कोसळली. यात 24 जणांचा दुर्दैवी अंत झाला.

पोलिसांनी सांगितलं की, अपघातातील काही प्रवासी हैतीचे आहेत. कारण, पेरूमध्ये हैतीयन स्थलांतरितांची संख्या वाढत आहे. पोलिसांनी ही माहिती स्थानिक माध्यमांना दिलीये. एपीच्या मते, "डेव्हिल्स कर्व्ह" म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठिकाणी हा अपघात झाला आहे. परंतु, अपघाताचं (Bus Accident) कारण तपासलं जात आहे.

पेरूच्या वाहतूक पर्यवेक्षी एजन्सीनं (SUTRAN) एका निवेदनात अपघाताची पुष्टी केलीये. परंतु, मृतांची संख्या आणि जखमींची संख्या दिलेली नाही. एजन्सीनं सांगितलं की, पेरूच्या उत्तरेकडील एल अल्टो जिल्ह्यातील क्यूओरिआंका टूर्स अगुइला डोराडा या कंपनीच्या बसला अपघात झाला.

अपघातादरम्यान अनेक प्रवाशांनी बसमधून उडी मारून स्वत:ला वाचवलं. मात्र, बहुतांश प्रवासी आत अडकले. अज्ञात जखमी प्रवाशांना लिमाच्या उत्तरेस 1,000 किलोमीटर दूर असलेल्या एल अल्टो आणि मॅनकोरा या रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं सर्वांवर उपचार केले जात आहेत. 2021 मध्येही अँडीज पर्वतावर महामार्गावरून बस कोसळून 29 जणांचा मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT