Chinese government mouthpiece People’s Daily urges Russia not to sell arms to India 
ग्लोबल

चीन असाही डाव : भारताला शस्त्रास्त्रे विकू नका; रशियाला विनंती 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सध्या भारत आणि चीनच्या सीमेवर तणावग्रस्त परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सध्याचा रशिया दौरा अत्यंत महत्वाचा आहे. राजनाथ सिंह यांच्या रशिया दौऱ्यात फायटर विमानांसाठी लागणाऱ्या सुट्टया भागांचा तात्काळ पुरवठा करण्याची मागणी करण्यात येणार आहे. अशात चीनच्या पीपल्स डेलीने रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये असे मत व्यक्त केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या संवेदनशील काळात रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये. आशियातील हे दोन्ही शक्तीशाली देश रशियाचे जवळचे रणनितीक भागीदार आहेत, असे पीपल्स डेली या वर्तमानपत्राने लिहिले आहे. इंडिया टुडे  या इंग्रजी संकेतस्थळाने याबाबत हे वृत्त दिले आहे. पीपल्स डेली हे चिनी सरकारचे मुखपत्र आहे. रशियाकडून आवश्यक युद्धसाहित्याची खरेदी करुन आपली लष्करी क्षमता अधिक बळकट करण्याचा भारताचा प्रयत्न सुरु असताना चिनी सरकारच्या मुखपत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. इमर्जन्सीमध्ये शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी भारत सरकारने ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. लडाखमधील वादाच्या पार्श्वभूमीवर भारताला तात्काळ ३० फायटर विमाने खरेदी करायची आहेत. यामध्ये मिग २९ आणि सुखोई ३० विमानांचा समावेश आहे, असे पीपील्स डेलीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, भारत आणि चीन नियंत्रण रेषेवर तणाव कमी करण्यावर दोन्ही देशांच्या सैन्याच्या अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले असल्याची माहिती समोर आली होती. चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली होती. या चर्चेमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर दोन्ही देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. गलवान खोऱ्यातील संघर्ष तसेच अन्य वादांच्या मुद्दावर या बैठकीत चर्चा झाली. चांगल्या, सकारात्मक वातावरणात ही चर्चा झाली असल्याचेही म्हटले होते.
-----------
लष्करप्रमुख मनोज नरवणे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर
-----------
भारत चीन वादात पडण्यास रशियाचा नकार
-----------
तसेच, गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत २० भारतीय जवान शहीद झाल्याचे भारताने स्पष्ट केले होते. यात चीनचे ४० हून अधिक सैनिक ठार झाल्याचे भारतीय लष्कराने, तसेच काही वृत्तसंस्थांनी म्हटले होते; पण चीनने त्यांच्या मनुष्यहानीबाबत मौन बाळगले होते. या पार्श्वभूमीवर चीनने पहिल्यांदाच मनुष्यहानीची कबुली दिली आहे. या संघर्षात कमांडिंग ऑफिसरसह १६ सैनिक मारले गेल्याची कबुली चीनने दिली आहे. मागील आठवड्यात चीनने राजनैतिक आणि लष्करी चर्चेत ही कबुली दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT