coronavirus woman arrested for licking worth of groceries at california 
ग्लोबल

महिलेने चाटले लाखो रुपयांचे किराणा साहित्य...

वृत्तसंस्था

साक्रामेंटो (कॅलिफोर्निया): एका सुपर मार्केटमध्ये एका महिलेने लाखो रुपयांचे साहित्य चाटले आहे. संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेनिफर वॉकर (वय 53) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. एका सुपर मार्केटमधील 1800 डॉलर्सचे (जवळपास 1.37 लाख रुपये) किराणा व अन्य साहित्य चाटल्यामुळे तिला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

साउथ लेक टाहोई पोलिस विभागाचे प्रवक्ते ख्रिस फिओरे यांनी सांगितले की, 'नेवाडाच्या सीमा लगत असलेल्या सेफवे स्टोरमधून अधिकाऱ्यांना फोन आला होता. एक महिला ग्राहक साहित्य चाटून पुन्हा ठेवत होती. तिला वस्तू खरेदी करायच्या नव्हत्या. तिने आपल्या कार्टमध्ये मांस, दारू व इतर वस्तू भरल्या होत्या. संक्रमणाच्या भितीने सर्व सामान नष्ट करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दखल घेतली जात आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, म्हणून काळजी घेणे गरजेचे असताना ही महिला साहित्य चाटताना आढळून आली.'

सेफवेच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, 'संशयित महिलेने आपल्या हातात ज्वेलरी घेतली होती. तिने आधी ज्वेलरी चाटली, इतर साहित्य चाटले आणि त्यानंतर कार्टमध्ये सामान भरले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT