coronvirus China Flaunts French Connection To Wuhan Lab and reply to America
coronvirus China Flaunts French Connection To Wuhan Lab and reply to America  
ग्लोबल

वुहान लॅबचे फ्रेंच कनेक्शन चीनने केले उघड

पीटीआय

जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या साथीला सर्व जग चीनला जबाबदार धरत असताना चीनने वुहान येथील लॅबशी असणारे फ्रेंच कनेक्शन गुरूवारी उघड करत एकच खळबळ उडवून दिली आहे. वुहानमधील ज्या लॅबमधून कोरोनाचा विषाणू बाहेर पडल्याचा दावा सर्व जग करत आहे ती बायो-लॅब चीन-फ्रेंच सहकार्य प्रकल्पातील असून फ्रान्समध्ये प्रशिक्षित केलेले कर्मचारीच या लॅबमध्ये कार्यरत असल्याचा दावा चीनने गुरुवारी केला आहे. 

जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या सथीला अमेरिकेने चीनला दोषी ठरवले असून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॅम्पिओ यांनी वुहानमधील प्रयोग शाळेत हा विषाणू तयार केला असून त्याद्वारे जगभरात हा विषाणू चीनने पसरवल्याचा आरोप केला आहे. यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हू चुनयिंग यांनी वुहान लॅबचे फ्रेंच कनेक्शन उघड करत अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

कोरोना विषाणूचं वेगाने पसरणारे संक्रमण रोखण्यासाठी जगभरातील अनेक राष्ट्रांना लॉकडाऊनसारख्या कठोर निर्णयाची अंमलबजावणी करावी लागत आहे. या रणनितीमुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूच्या संकटातून सावरण्यासाठी सध्याच्या घडीला अर्थव्यवस्था कोलमडण्याची जोखीम स्वीकारल्याशिवाय कोणताही पर्याय दिसत नाही. 

जागतिक महासाथीच्या रोगाने निर्माण केलेली युद्धजन्य परिस्थिती अमेरिका-चीन यांच्यातील तणावर वाढवण्याचे संकेतही देत आहे. 2019 च्या डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात आढळला होता. त्यानंतर चीनमध्ये या रोगाने थैमान माजवले. चीनने जीवघेण्या रोगासंदर्भातील माहिती लपवून जगाला या संकटात आणले आहे, अशी टीकाही चीनवर झाली. याच्यापुढे जात कोरोना विषाणूची उत्पती ही चीनच्या लॅबमध्ये (प्रयोग शाळेत) झाल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात वेळोवेळी चीनला धमकी वजा इशारा दिल्याचेही पाहायला मिळाले. 

दोन्ही राष्ट्रांतील तणावपूर्ण परिस्थितीत चीनमधून अमेरिकन कंपन्या  काढता पाय घेण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा देखील रंगत आहे. चीनमधून शट डाऊन होणाऱ्या अमेरिकन कंपन्यांना भारतात उद्योगाचे व्यासपीठ खुले करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे. अमेरिका-चीन यांच्यातील वादात अमेरिकन कंपन्यांनी चीनची भूमी सोडून भारतात बस्तान बसवण्याला तयारी दर्शवली तर भारतीय अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यास निश्चितच मदत होईल. चीनने फ्रान्स कनेक्शन उघड केल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात आणखीनं खळबळ माजली असून यापार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची संकेत मिळत आहेत.  

जगभरात आतापर्यंत 38 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. यात जवळपास 2 लाख 50 हजारहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. या जीवघेण्या विषाणूने अमेरिकेला मोठा फटका बसला आहे. एकट्या अमेरिकेत मागील 24 तासांत कोरोनामुळे 25 हजार लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा हा 74 हजारचा टप्पा पार केलाय. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 12 लाखहून अधिक आहे.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्या नाराजीवर तटकरेंचे ‘ऑल इज वेल’; प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी घेतली भुजबळांची भेट

Nupur Shikhare- Ira Khan : नुपूर शिखरेच्या आईचा बॉसी अंदाज; नवऱ्याची अवस्था पाहून आमिरची लेक म्हणाली...

SRH vs GT: सामना रद्द झाल्यानंतर काव्या मारन अन् विलियम्सनचं रियुनियन, सनरायझर्स हैदराबादन शेअर केला खास Video

VIDEO: पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत भर कार्यक्रमात गैरवर्तन; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "दहा हजारपेक्षा जास्त लोकांचा जमाव..."

Latest Marathi News Live Update : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे

SCROLL FOR NEXT