viral video sakal
ग्लोबल

Video: डिलिव्हरी बॉयने वाटेतचं फस्त केले चिकन; ग्राहकाला पाठवले फक्त हाडे

एका डिलिव्हरी बॉयने स्वत:च वाटेतच ऑर्डर केलेले चिकन फस्त केले आणि ग्राहकाला चक्क फक्त हाडे पाठवले.

सकाळ डिजिटल टीम

सध्या सर्वजण ऑनलाईन फुड डिलिव्हरीला प्राधान्य देतात. कारण ऑनलाईन डिलिव्हरीने बऱ्याच गोष्टी सोपी झाल्यात. अगदी काही मिनिटात तुम्हाला तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तु घरपोच मिळतात. यात फुड डिलिव्हरी खुप अग्रेसर आहे. आपल्या आवडीचं हवं तसं आपल्याला मिळत असते. पण आम्ही तुम्हाला जर म्हटलं की तुम्ही ऑर्डर केलेलं फुड कुणीतरी वाटेतचं फस्त केलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. कारण हे शक्य नाही. पण असं घडलयं.

एका डिलिव्हरी बॉयने स्वत:च वाटेतच ऑर्डर केलेले चिकन फस्त केले आणि ग्राहकाला चक्क फक्त हाडे पाठवले. (delivery boy ate whole chicken and left only bone with letter of sorry for the customer )

सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका व्यक्तीने चिकन विंग्ज आणि ज्यूसचा ऑर्डर केला होता. पण जेव्हा त्याला ऑर्डर डिलिव्हर झाली तेव्हा त्यातील चिकनचे विंग्ज पुर्णपणे फस्त करण्यात आले होते आणि हाडांसह एक चिठ्ठी पाठविण्यात आली.

चिठ्ठीत लिहिले होते, “मला खूप भूक लागली त्यामुळे मी चिकन खाल्ले पण ज्यूसला हातही लावलेला नाही. तुम्ही ज्यूस पिऊ शकता."

चिठ्ठी पाहून ग्राहक थक्क झालाय. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ Tiktok युजर @thesuedeshow ने शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT