End Of The World
End Of The World esakal
ग्लोबल

End Of The World : या रस्त्याच्या शेवटी खरंच आपले जग संपते अन् दिसते...

Lina Joshi

End Of The World : फिरायला कोणाला आवडत नाही? अनेकांना तर जगाचा प्रत्येक कोपरा बघायचा असतो, यवारती अनेक सिनेमात आपण अशा संदर्भातली वाक्य सुद्धा ऐकतो, पण तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे?

जग म्हणजे आपली पृथ्वी गोल आहे आणि वर्तुळाला का कधी कोणता कोपरा असतो? वर्तुळ कधीच संपू नाही शकत, कारण त्याचा अंत अशक्य आहे.

असं वाटत असतांना एक गंमत तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकते, अन् ती म्हणजे आपल्या पृथ्वीला अंत आहे तिला असं एक टोक आहे जिथे ती संपते. आज आम्ही तुम्हाला जगाच्या अशा एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत ज्याला पृथ्वीचा शेवट म्हणतात.

इथे पोहोचल्यानंतर जगाचा अंत होतो असे मानले जाते. वास्तविक हा एक खास रस्ता आहे जो पृथ्वीवरील शेवटचा रस्ता मानला जातो. याबद्दल अजून जाणून घेण्याची उत्सुकता वाटते आहे ना? मग हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

हा रस्ता कुठे आहे?

हा रस्ता युरोपियन देश नॉर्वेमध्ये आहे, जो E-69 महामार्ग म्हणून ओळखला जातो. हा जगातील शेवटचा रस्ता मानला जातो. या महामार्गाची एकूण लांबी 14 किमी आहे. E-69 महामार्गाच्या समाप्तीसह, पृथ्वी देखील संपली असं मानलं जातं.

पण असं का?

वाचल्यावरती अनेक कल्पना डोक्यात येत असतील, साहजिक आहे पण तुम्ही कल्पना करता असे काही इथून पुढे काहीही नाही आणि आपण कुठेतरी खाली पडू असं सुद्धा काहीही घडत नाही.

खरंतर हा रस्ता संपल्यानंतर फक्त हिमनदी आणि समुद्र दिसतो. या E-69 महामार्गावर अनेक धोकादायक ठिकाणे आहेत, ज्यामुळे इथे कार चालवणे किंवा एकटे चालणे प्रतिबंधित आहे.

तुम्हाला पण शेवटचा रस्ता बघण्याची इच्छा आहे?

जर तुम्हाला जगाचा शेवटचा रस्ता पाहायचा असेल तर तुम्ही स्वतःच्या इच्छेने जाऊ शकत नाही. कारण या रस्त्यावर वाहन चालवण्यास किंवा एकट्याने चालण्यास बंदी घालण्यात आली आहे. बर्फवृष्टीमुळे हा परिसर थंडच राहतो, तसेच बर्फवृष्टीमुळे अनेकदा लोक भरकटतात.

यामुळेच लोकांना येथे एकट्याने फिरू दिले जात नाही. पण जर तुम्हाला जगातील शेवटचा रस्ता पाहायचा असेल तर तुम्ही ग्रुपसोबत फिरायला जाऊ शकता. जगातील शेवटच्या रस्त्याची खास गोष्ट म्हणजे तो उत्तर ध्रुवाजवळ आहे. ज्यामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळते.

तब्बल सहा महिने सूर्य उगवत नाही

उत्तर ध्रुवाजवळ असल्याने इथे हिवाळ्यात फक्त रात्र असते. कधी कधी असे देखील होते की इथे सहा महिने सूर्य उगवत नाही तर उन्हाळ्यात इथे सूर्य कधीच मावळत नाही.

उन्हाळ्यात इथलं तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या आसपास असते, तर हिवाळ्यात तापमान -45 अंशांपर्यंत खाली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam : ''माझी घरवापसी होतेय, तीस वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत...'', संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश ठरला

AstraZeneca Covid Vaccine Side Effects: किती ट्रायल घेतल्यानंतर कोविशील्ड लसीला मंजूरी मिळाली? आता का होतायत आरोप?

Smart TV Tips : Smart TV सतत बंद पडते, सिग्नल जातो तर घरीच करा ठिक, या टिप्स वापरून पहा

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Satara News : आमदार मकरंद पाटील उदयनराजेंच्या प्रचारात दिसत नाहीत; शंभूराज देसाईनी सांगितलं हे कारण

SCROLL FOR NEXT