Diwali in US eSakal
ग्लोबल

Diwali Holiday in US : आली माझ्या घरी ही दिवाळी! न्यूयॉर्कच्या मेयर ऑफिसमध्ये वाजले ढोल ताशे; व्हिडिओ व्हायरल

या विधेयकावर अद्याप राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नाही.

Sudesh

अमेरिकेमध्ये आता भारतीय संस्कृतीला मोठ्या प्रमाणात महत्व मिळत आहे. त्यामुळेच, न्यूयॉर्क प्रशासनाने आता शाळांच्या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये दिवाळीचाही समावेश केला आहे. शहराचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी अमेरिकेतील कित्येक भारतीय उपस्थित होते.

ढोल ताशांच्या गजरात घोषणा

मेयर एरिक यांनी ढोल ताशांच्या गजरात ही घोषणा केली. एरिक यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. या ट्विटमध्ये त्यांनी या प्रसंगाचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. या विधेयकावर अद्याप राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नाही, ते नक्कीच याला मान्यता देतील असा विश्वास यावेळी एरिक यांनी व्यक्त केला.

'सुट्टीसाठीच्या या लढ्यामध्ये न्यूयॉर्क विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार यांच्यासोबत उभं राहणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे खूप लवकर होईल, पण - शुभ दिवाळी!' अशा आशयाचं ट्विट एरिक यांनी केलं आहे.

न्यूयॉर्कमध्ये मोठं सेलिब्रेशन

न्यूयॉर्कमध्ये दर वर्षी सुमारे सहा लाख लोक दिवाळी साजरी करतात. यामध्ये हिंदू धर्मीयांसोबतच इतर धर्मीय आणि न्यूयॉर्कमधील स्थानिकही आनंदाने सहभागी होतात. केवळ न्यूयॉर्कमध्येच नाही, तर अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसीमध्येही दिवाळी साजरी होते.

पेन्सिल्व्हेनियामध्ये आधीच निर्णय

दरम्यान, अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया शहरात याापूर्वीच असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यानंतर आता न्यूयॉर्कनेही हा निर्णय घेत शहरातील भारतीयांना खुश केलं आहे. या विधेयकाला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Delhi Pollution : दिल्लीतील प्रदूषणाचा फटका! 50% वर्क फ्रॉम होम बंधनकारक; बांधकाम मजुरांना मिळणार 10 हजारांची मदत

IPL Auction : जडेजाची कॉपी! CSKने उगाच १४ कोटी नाहीत मोजले, प्रशांत वीरचे Six एकदा बघाच... Video Viral

माधुरी दीक्षितने विकला जुहूचा फ्लॅट; १. ९५ कोटींचं घर कितीला विकलं? किंमत वाचून थक्क व्हाल

Prithvi Shaw : ती खोटारडी...! पृथ्वी शॉ मुंबई न्यायालयात पोहोचला, सादर केलं प्रतिज्ञापत्र; आता कोणता नवा कांड केला?

SCROLL FOR NEXT