Eternal Flame Falls sakal
ग्लोबल

Eternal Flame Falls : दैवी शक्ती की विज्ञानाचं रहस्य... झऱ्याच्या खाली सतत जळत असते "आग"

जगातील अशा काही गोष्टी ज्या एक रहस्य म्हणून समोर आलेल्या आहे

निकिता जंगले

निसर्ग हे मायाजाल आहे. सृष्टीने इतकी सुंदर आहे की येथे प्रत्येक गोष्टी अचंबित करणाऱ्या असतात. जगात असे अनेक आश्चर्य असततात की ज्याचे प्रश्न निरुत्तर असतात. जगातील अशा काही गोष्टी ज्या एक रहस्य म्हणून समोर आलेल्या आहे ज्याला आपण दैवी शक्ती म्हणू की विज्ञानाचं रहस्य हे कळायला अवघड आहे.

आज आपण अशाच एका रहस्यमय ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत. या रहस्यमय ठिकाणी पाण्याचा झरा सतत वाहत असतो पण या झऱ्याच्या थेट खाली अनेक वर्षांपासून आग जळताना दिसते. या रहस्यमय ठिकाणाविषयी जाणून घेतल्यानंतर प्रत्येकजण अचंबित असतो. (do you know about mysterious Eternal Flame Falls )

हा अनोखा झरा न्यूयॉर्कमध्ये चेस्टनट रिज काउंटी पार्कमध्ये स्थित आहे. यालाच एटरनल फ्लेम फॉल सुद्धा म्हटले जाते. या झऱ्याची खासियत म्हणजे येथे वर्षभर पाणी वाहत राहते आणि त्याखाली सतत आग जळत असते. हे दिसायला एका दैवी चमात्कारासारखं दिसतं. त्यामुळेच स्थानिक लोक याला दैवी चमत्कार मानतात.

याशिवाय यासंबंधीत काही कथा सुद्धा प्रचलित आहे. असं म्हणतात की ही आग तेव्हा विझणार जेव्हा या पृथ्वीवर संकट येणार. या आगीला पाहण्यासाठी दुरवरुन लोक येतात.

शास्त्रज्ञांनी झरा आणि याखालील जळत्या आगीवर शोध घेण्याचा प्रयत्न केला. या जळत्या आगीमागे काय रहस्य आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. रिसर्चमधून शास्त्रज्ञांनी हा अंदाज लावला की मिथेन गॅसमुळे हे घडत असावं. शास्त्रज्ञांच्या मते या झऱ्याखाली गुफा आहे आणि येथून मिथेन गॅस बाहेर पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT