Donald Trump publicly praising White House Press Secretary Caroline Leavitt for her looks during a speech, sparking widespread media discussion.

 

esakal

ग्लोबल

Donald Trump Special Comments Video : ‘’तो सुंदर चेहरा अन् मशीनगन सारखे ओठ…’’ ; ट्रम्प यांनी जाहीरपणे नेमकी कुणाची केली एवढी स्तुती?

Donald Trump remarks praising Caroline Leavitt’s appearance : जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

Mayur Ratnaparkhe

Donald Trump Remarks White House Press Secretary Caroline Leavitt अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचे निर्णय आणि विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. ते कधी कुणाबद्दल काय निर्णय घेतली आणि कुठं काय बोलतील हे कुणीच सांगू शकणार नाही. याचा प्रत्यय देणारी घटना नुकतीच समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यक्रमातील त्यांच्या जाहीर भाषणात बोलताना त्यांच्या व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांचे सौंदर्य आणि ओठांचे कौतुक केले. यावेळी मोठ्यासंख्येने नागरिकांची उपस्थिती होती. ट्रम्प यांच्या या विधानावर उपस्थित नागरिकांकडूनही प्रतिसाद दिला गेला. ट्रम्प यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

खरंतर ट्रम्प पेनसिल्व्हेनियातील एका रॅलीत त्यांच्या सरकारच्या आर्थिक यशाचे कौतुक करत भाषण देत होते. दरम्यान काहीवेळासाठी ते त्यांच्या भाषणापासून भरकटले आणि त्यांनी मध्येच त्यांच्या २८ वर्षीय प्रेस सेक्रेटरीचे कौतुक करण्यास सुरुवात केली.

 ट्रम्प यांनी ती किती सुंदर आहे हे सांगितले, ते म्हणाले, "आज आम्ही आमची सुपरस्टार, कॅरोलिनला घेऊन आलो आहोत. ती ग्रेट नाही का? कॅरोलिन ग्रेट आहे का? असं त्यांनी टाळ्या वाजवणाऱ्या उपस्थितांना विचारले. त्यावर सर्वांना एका सूरात होय, असा त्यांना प्रतिसाद दिला.

ट्रम्प तिथेच थांबले नाहीत. त्यानंतर त्यांनी कॅरोलिन लेविटच्या शरीरयष्टीची आणि आत्मविश्वासाची प्रशंसा केली, जी त्याच्यापेक्षा जवळजवळ ५० वर्षांनी लहान आहे. ट्रम्प म्हणाले, "तुम्हाला माहिती आहे, जेव्हा ती टेलिव्हिजनवर जाते, फॉक्सवर..., तेव्हा  ती वर्चस्व गाजवते... त्या सुंदर चेहऱ्याने आणि त्या ओठांसह जे थांबत नाहीत, एका छोट्या मशीनगनसारखे." यानंतर ट्रम्प यांनी जरा वेगळा आवाजही काढला, ज्यावर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत आणि ओरडत त्यांना प्रतिसाद दिला.

याआधी देखील ऑगस्टमध्ये न्यूजमॅक्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ट्रम्पने लेविटबद्दल अशाच प्रकारच्या टिप्पण्या केल्या आहेत. ते म्हणाले होते की, " "मला वाटत नाही की कॅरोलिनपेक्षा चांगली प्रेस सेक्रेटरी कोणाकडे असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar: ''पार्थ पवारांवर अजून गुन्हा का दाखल नाही?'', हायकोर्टाने स्वतःहून विचारलं; ''हे तेच का उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव..''

IPL 2026 Auction: ३०००+ धावा अन् १०० + विकेट्स! ऑल-राऊंडरसाठी Mumbai Indians जोर लावणार; कोण आहे विरनदीप सिंग?

Jio University: महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात रिलायन्सचे 'जियो विद्यापीठ' सुरू होणार, पण कधी अन् कसे? जाणून घ्या...

Unusual Marriage Ritual : अजब प्रथा! लग्नावेळी घोडीवर बसण्याआधी नवरदेवाला आई करते स्तनपान

Electric Vehicle Toll: वाहनचालकांना मोठा दिलासा! भरलेला टोल आता परत मिळणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT