WHO Chief.jpg
WHO Chief.jpg 
ग्लोबल

कोरोना महामारीचा दुष्परिणाम पुढील अनेक दशकांपर्यंत जाणवणार - डब्लूएचओ

सकाळ डिजिटल टीम

जिनिव्हा : कोरोना विषाणूचा जागतिक प्रसार अजूनही वेगाने होत असून, या महामारीचे दुष्परिणाम पुढील दशकांपर्यंत जाणवणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्लूएचओ) प्रमुख टेड्रोस गेब्रेएसेस यांनी आज म्हटले आहे. दुबई येथील आरोग्य परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलताना टेड्रोस गेब्रेएसेस यांनी या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी सर्व राष्ट्रांनी मिळून एकत्र येत प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. शिवाय सध्याच्या परिस्थितीत हा विषाणू अधिकच वाढत असल्याचे टेड्रोस गेब्रेएसेस यांनी यावेळी सांगितले. 

डब्लूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेएसेस यांनी आज व्हर्च्युअल कॉन्फरन्स दरम्यान, जोपर्यंत विभागलेले जग अस्तित्वात आहे तोपर्यंत कोरोनाच्या महामारीला रोखता येणे कठीण असल्याचे म्हटले आहे. सर्व जगभर पसरलेल्या या विषाणूचा पराभव करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे टेड्रोस गेब्रेएसेस यांनी म्हटले असून, सध्याच्या स्थितीला कोरोना विषाणू हा जगातील सर्वात मोठा धोका नाही तर, या विषाणूसोबतच जगातील एकता आणि जागतिक नेतृत्वाचा अभाव या गोष्टी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सध्याचे संकट हे फक्त आरोग्य संदर्भात संकट नसून, आर्थिक, सामाजिक आणि काही देशांमध्ये राजकीय संकट असल्याचे टेड्रोस गेब्रेएसेस यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त टेड्रोस गेब्रेएसेस यांनी सर्वच क्षेत्रात कोरोनामुळे झालेले नुकसान मोठे असल्याचे सांगत, याचे परिणाम जगात अनेक पुढील दशकांपर्यंत राहणार असल्याचे मत व्यक्त केले.      

तसेच, याअगोदर डब्लूएचओने कोरोनाच्या विषाणूची पुढची लाट येण्याची शक्यता वर्तविली होती. याचा पुनरुच्चार टेड्रोस गेब्रेएसेस यांनी केला आहे. कोरोनाच्या खबरदारीसाठी केलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच देशांची आर्थिक परिस्थिती कमालीची ढासळली होती. त्यानंतर काही देशांनी लॉकडाउन हटविण्याचा किंवा लॉकडाउनचे काही नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा निर्णय महागात पडू शकण्याची भीती यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली होती. संपूर्ण जगभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळ जवळ ९० लाखांवर पोहचली असून, या विषाणूच्या संसर्गाने ४ लाख ६८ हजार ८८१ जणांचा जीव घेतला आहे. त्यामुळे अजूनतरी कोरोना विषाणूचा अटकाव करता येऊ शकत नसल्याने लॉकडाउन हटविणे जोखमीचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT