Google_Eileen_Naughton 
ग्लोबल

कर्मचाऱ्यांसोबतचा संघर्ष 'गुगल'च्या एचआरला भोवला; होणार पायउतार!

वृत्तसंस्था

कॅलिफोर्निया : गुगलचे मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख (एचआर हेड) ईलीन नॉटन या पदावरून पायउतार होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

ईलीन नॉटन सध्या गुगलमध्ये पिपल ऑपरेशन या विभागाच्या उपाध्यक्षा आहेत. ईलीन यांच्या कंपनीतील कामगिरीसाठी आणि योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यांच्या गुगलबरोबरील पुढील वाटचालीबद्दल आम्ही आशावादी आहोत, असे मत गुगल आणि तिची प्रवर्तक कंपनी अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी व्यक्त केले आहे. 

नॉटन गुगलमध्ये 2006 पासून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हाताळत आहेत. 2016 पासून त्या मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. मागील काही वर्षात गुगलला कर्मचाऱ्यांबरोबरच्या मोठ्या संघर्षाला आणि तणावाला सामोरे जावे लागते आहे. 
'गुगलने नॉटन यांच्या कारकिर्दीत 70,000 पेक्षा जास्त कर्मचारी जोडले असल्याचेही' पिचाई यांनी सांगितले. गुगलच्या नव्या एचआर हेडच्या शोधासाठी आणि नियुक्तीसाठी आपण सुंदर पिचाई आणि मुख्य वित्तीय अधिकारी रुथ पोराट यांच्यासोबत काम करू, असे नॉटन यांनी म्हटले आहे. 

'माझे पती आणि मी यांनी सहा वर्षाआधीच ठरवले होते की लंडन आणि सॅन फ्रान्सिस्को येथे काम करून पुन्हा एकदा न्यूयॉर्कला आपल्या कुटुंबीयांकडे परतायचे', असेही नॉटन यांनी सांगितले आहे. अलीकडच्या काही वर्षात कर्मचाऱ्यांच्या विरोधामुळे आणि वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांबरोबरील संघर्षामुळे गुगलमधील वातावरण ढवळून निघाले आहे. यात अमेरिकी लष्कराबरोबरच्या कंत्राटापासून ते चीनमधील सर्च इंजिन सुरू करण्याच्या मुद्द्यांपर्यंत असंख्य मुद्द्यांचा समावेश आहे.

नोव्हेंबर महिन्यात गुगलने चार कर्मचाऱ्यांना माहिती सुरक्षेच्या धोरणांचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव नोकरीवरून काढून टाकले होते. मात्र गुगलने कर्मचाऱ्यांना एकत्र येऊ न देण्याच्या धोरणातून हे पाऊल उचलल्याचा आरोप त्या वेळी झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

AI cough test for TB: खोकल्याच्या आवाजातून कळणार टीबीचा धोका? राजस्थानमध्ये AIच्या मदतीने नवा प्रयोग

कतरिनाचा दीर पडला वहिनीच्या बहिणीच्या प्रेमात? सनी कौशलच्या 'त्या' एका पोस्टने चर्चेला उधाण, Viral

२१ वर्षीय तरुणानं १७ वर्षीय प्रेयसीसोबत नको ते केलं, आई-वडील घरी परतताच लेक अस्वस्थ पडून, तर तरूण...; नवी मुंबईत काय घडलं?

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

SCROLL FOR NEXT