ग्लोबल

स्यू की यांच्या प्रमुख सहकाऱ्याला अटक

वृत्तसंस्था

यांगून - म्यानमारच्या लष्कराने उठावानंतर आपली पकड आणखी घट्ट केली असून आघाडीच्या नेत्या आँग सान स्यू की यांचे प्रमुख सहकारी विन हतैन यांना शुक्रवारी अटक केली. दरम्यान, देशभर नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करीत आहेत.

हतैन हे स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी (एनएलडी) पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. ते स्यू की यांचे  उजवे हात मानले जातात. मुलीच्या घरातून त्यांना अटक करण्यात आली. ते ७९ वर्षांचे असून लष्करी राजवटीच्या विरोधात त्यांना अनेक वेळा दीर्घ तुरुंगवास किंवा डांबून ठेवण्यात आले आहे. पक्षाचे प्रसिद्धी अधिकारी क्यी टो यांनी ही माहिती दिली.

हतैन यांनी बीबीसी रेडिओच्या म्यानमार येथील स्थानिक भाषेतील सेवा केंद्राबरोबर संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासाठी आजीवन कारावासाची कमाल शिक्षा आहे. माझे बोलणे लष्कराला आवडत नाही. त्याची त्यांना भिची वाटते. 

टीकेचा संदर्भ
अटक होण्यापूर्वी हतैन यांनी स्थानिक प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी लष्करावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, लष्कराचे सत्ता उलथून टाकण्याचे कृत्य शहाणपणाचे नाही. लष्कराचे नेते देशाला चुकीच्या दिशेने नेत आहेत. आपले सरकार संपवून ते वाटचाल शून्यावर नेत आहेत. लोकांनी उठावाविरुद्ध शक्य तेवढा आवाज उठवावा.

आर्थिक राजधानीसह अनेक ठिकाणी सलग तिसऱ्या रात्री नागरिकांनी एकत्र येऊन थाळीनाद केला तसेच वाहनांचे हॉर्न वाजवून संताप व्यक्त केला.

शिक्षकांचा सहभाग
शुक्रवारी डॅगॉन विद्यापीठाचे अनेक शिक्षक एकत्र आले आणि त्यांनी तीन बोटांद्वारे सलाम करीत पाठिंबा दर्शविला. हाँगकाँग , थायलंड येथील लोकशाहीवादी चळवळीच्या समर्थकांच्या संकल्पनेतील कृतीचे अनुकरण त्यांच्याकडून केले जात आहे. 

फेसबुक ब्लॉकनंतर ट्विटरचा पर्याय
म्यानमारमधील दूरसंचार कंपन्यांना फेसबुक ब्लॉक करण्याचा आदेश लष्कराने दिला. म्यानमारमध्ये लाखो लोकांसाठी इंटरनेट वापराचे आणि त्यावरील संवादाचे फेसबुक हे माध्यम आहे. ते नसूनही लोकांनी पर्याय काढला असून गेल्या काही दिवसांत ट्विटरचा वापर सुरु केला आहे. याशिवाय व्हीपीएनचाही (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) वापर सुरू आहे.

हॅशटॅगचाही वापर केला जात आहे. यात  #HearTheVoiceof Myanmar आणि  #RespectOurVotes हे दोन हॅशटॅग शुक्रवारी ट्रेडिंग होते. ७० लाखांहून जास्त पोस्टमध्ये याचा उल्लेख होता. गेल्या वर्षी निवडणुकीतील मतांचा आदर केला जावा असा आवाज जनतेने उठविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT