पाकिस्तानमध्ये ईशनिंदाप्रकरणी एका हिंदू शिक्षकाला सुनावली जन्मठेपेची शिक्षा  टिम ई सकाळ
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये ईशनिंदाप्रकरणी एका हिंदू शिक्षकाला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये लाल यांना अटक करण्यात आली होती

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानच्या दक्षिणेकडील सिंध एका स्थानिक न्यायालयाने मंगळवारी एका हिंदू शिक्षकाला (Teacher) ईशनिंदाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सिंधमधील घोटकी येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुर्तजाद्वारा यांनी शिक्षक नौतन लालवर ५० हजार पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 2019 पासून तुरुंगात नौतन लाल तुरूंगात होते. आता न्यायालयाने (Court) त्यांना दोषी ठरवले. गेल्या दोन वर्षांत लाल याचा जामीन अर्ज दोनदा फेटाळण्यात आला.

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये लाल यांना अटक करण्यात आली होती ज्या व्हिडीओमध्ये एका शाळेतील विद्यार्थ्याने हिंदू शिक्षकावर ईशनिंदा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही वेळातच जमात-ए-अहले सुन्नत पार्टीचे नेते अब्दुल करीम सईदी यांनी लाल यांच्याविरुद्ध ईशनिंदा कायद्याखाली पोलिसांत तक्रार दाखल केली. स्थानिक महाविद्यालयात भौतिकशास्त्र (Physics) शिकवणाऱ्या लालने त्या दिवशी शाळेत पोहोचल्यानंतर असे कृत्य केल्याचा दावा विद्यार्थ्याने केला होता. ही बातमी पसरताच शहरात निदर्शने झाली आणि संतप्त जमावाने सचो सतराम धाम मंदिरावर हल्ला केला आणि घोटकी येथील मूर्तींची तोडफोड केली होती.

पाकिस्तान पूर्व सेना प्रमुख जिया उल हक ने 1980 मध्ये ईशनिंदा कायदा लागू केला. या कायद्यानुसार कोणालाही फाशी दिलेली नाही परंतु ईशनिंदाच्या संशयात बरेच लोक मारले गेले. अनेकवेळा ईशनिंदा कायद्याचा चुकीचा वापर केला आहे, मानव आणि नागरिक अधिकारी समुहाने म्हटले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Nano Banana AI 3D Video Prompt: मॉडेल इमेजेसनंतर आता 3D व्हिडिओ ट्रेंड, एका मिनिटापेक्षा कमी वेळात तयार करा खास व्हिडिओ

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pre-Wedding Photoshoot: प्री-वेडिंग शूट करायचंय? मग साताऱ्याचं कास पठार आहे एक परफेक्ट ठिकाण!

SCROLL FOR NEXT