Husband murdered by author of How to Kill Your Husband
Husband murdered by author of How to Kill Your Husband  Sakal
ग्लोबल

'हाऊ टू किल युवर हजबंड' हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखिकेनेच केला पतीचा खून

सकाळ डिजिटल टीम

पती-पत्नीच्या भांडणाचे अनेक आश्चर्यकारक प्रकरणे जगभरातून समोर येतात. कधीकधी त्यांचा शेवट खुनापर्यंत पोहोचतो. अमेरिकेतील एका लेखिकेशी (author) संबंधित असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात लेखिकेने स्वतःच पतीची हत्या (Husband murdered) केली. मात्र, याबद्दल कोणाला काहीही माहिती नाही. हद्द तेव्हा झाली जेव्हा महिलेने 'नवऱ्याला कसे मारायचे?' (हाऊ टू किल युवर हजबंड) हे पुस्तक लिहिले. (Husband murdered by author of How to Kill Your Husband)

डेली मेलच्या वृत्तानुसार, या लेखिकेचे नाव नॅन्सी क्रॅम्प्टन ब्रॉफी आहे. तिच्या नवऱ्याचे नाव डॅनियल ब्रॉफी आहे. लेखिकेने ‘नवऱ्याला कसे मारायचे’ असे एक पुस्तक लिहिले आहे. या महिलेला नवऱ्याच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नॅन्सीने शेफ असलेल्या नवऱ्याला गोळ्या घालून ठार (Husband murdered) केल्याचा आरोप आहे.

नॅन्सीने सुमारे चार वर्षांपूर्वी नवऱ्याला गोळ्या घालून ठार (Husband murdered) केले होते. काही लोक तिच्या जवळ पोहोचले तेव्हा त्यांना नवरा डॅनियलचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला. हत्येच्या अर्धा तास आधी नॅन्सी तिथे होती असे पोलिसांनी सांगितले. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता हळूहळू हे प्रकरण उघडकीस आले.

लेखिकेने (author) हत्येचा (Husband murdered) गुन्हा कबूल केला नसला तरी नुकतेच न्यायालयाने या प्रकरणात नॅन्सीला सेकंड डिग्री हत्येप्रकरणी दोषी ठरवले आहे. ही बाब ऐकून न्यायालयाचे न्यायाधीशही आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, लवकरच शिक्षा होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil: या 8 गावांवर विशाल-विश्वजित यांचे विशेष लक्ष, जयंत पाटलांच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चे नियोजन?

Sonakshi & Zaheer Wedding : शत्रुघ्न सिन्हा लावणार लेकीच्या लग्नाला हजेरी; भांडणाच्या चर्चांवर अखेर पडदा

Pankaja Munde: "सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी"; पंकजा मुंडेंचं हाकेंसाठी सरकारला साकडं

T20 WC 2024 Super 8 Weather Forecast : वर्ल्ड कप जिंकण्याचे कर्णधार रोहितचे स्वप्न जाणार वाहून? 'सुपर-8'वर वरुणराजाची टांगती तलवार

Anti-Theft Feature : मोबाईल चोरांचे वाईट दिवस सुरु! गुगल आणतंय 'हे' नवीन AI फिचर,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT