Rishi Sunak  sakal
ग्लोबल

Illegal Migrants: ब्रिटनमध्ये अवैध स्थलांतरितांना नो एन्ट्री… ऋषी सुनक यांनी आखली नवीन योजना

Sandip Kapde

ब्रिटनमध्ये इतर देशातून आश्रय घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे ब्रिटन प्रशासनावर आणि तेथील स्थानिक नागरिकांवर याचा परिणाम होत आहे.  दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अवैध स्थलांतरितांना इशारा दिला आहे. या प्रवाशांना आता ब्रिटिश करदात्यांच्या पैशांवर चालणाऱ्या हॉटेलमध्ये ठेवले जाणार नाही तर जहाजांवर ठेवले जाईल.

सोमवारी सुनक यांनी अवैध स्थलांतरितांवर टीका केली. ते म्हणाले ब्रिटन सरकार या अवैध प्रवाशांना जे काही द्यायला हवे त्यापेक्षा जास्त देत आहे.

अवैध स्थलांतरितांना आता जहाजांवर ठेवले जाईल, याबाबत नियोजन सुरू असल्याचे सुनक यांनी सांगितले.

केंट किनारपट्टीच्या डोव्हर शहरातील सुनक यांनी सांगितले की, एक जहाज महिन्याच्या अखेरीस तयार होईल. आणखी दोन जहाजही तयार केले जातील. यात सुमारे १ हजार लोक राहू शकतात.

अवैध स्थलांतरित विधेयक किंवा स्टॉप द बोट्स विधेयक हाऊस ऑफ कॉमन्सने मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली. आता त्यांच्या सरकारला बेकायदेशीरपणे देशात येणाऱ्यांना ताब्यात घेण्याचा आणि हद्दपार करण्याचा अधिकार मिळणार आहे.

भारतीय वंशाचे सुनक म्हणाले, "मी तुम्हाला वचन दितो की आम्ही बेकायदेशीर स्थलांतरितांना हॉटेलमधून बाहेर काढू आणि त्यांना लष्करी सुविधांसह पर्यायी ठिकाणी नेऊ. स्थानिक लोकांवरील दबाव कमी करण्यासाठी आम्ही त्यांना जहाजांवरही ठेवू"

आता ज्या स्थलांतरितांना हॉटेलमध्ये ठेवले जाईल त्यांना रूम शेअर करावी लागणार आहे, असे सुनक यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यावर अवैध स्थलांतरितांनी लंडनमध्ये निदर्शने केली होती. यांना सुनक यांनी फटकारले आहे. या संदर्भात सुनक यांनी कडक शब्दात सांगितले की, 'जेथे शक्य असेल तेथे आम्ही त्यांना रूम शेअर करण्यास सांगू. यासाठी आम्हाला अतिरिक्त ११,५०० ठिकाणे शोधली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इस्रायल इराण युद्धाचा थेट परिणाम, कच्च्या तेलाच्या दराचा भडका; पेट्रोल-डिझेल महाग होणार?

Iran vs Israel युद्ध आणखी भडकणार! इराणला पाठिंबा देत हिजबुल्लाहचे इस्रायलवर हल्ले, इस्रायलचा लेबनॉनच्या राजधानीतही विध्वंस

Minor Sexual Assault Case : सांगली हादरली! अल्पवयीन मुलीवर 5 नराधमांकडून सलग 2 वर्षे लैंगिक अत्याचार; जन्मदात्या आईने परराज्यात जाऊन मुलीचा केला गर्भपात

Latest Marathi News Live Update : मिरज शहरात दोन दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

मोठी बातमी! ५ किलोमीटरमधील कमी पटाच्या शाळांचे दुसऱ्या शाळेत होणार समायोजन; शासनाच्या ‘या’ निर्णयामुळे राज्यातील २५० शाळांचे भवितव्य अंधारात

SCROLL FOR NEXT