MP Raja Krishnamurthy
MP Raja Krishnamurthy esakal
ग्लोबल

Raja Krishnamurthy : भारतीय वंशाच्या खासदारानं इलिनॉयमधून मिळवला मोठा विजय

सकाळ डिजिटल टीम

कृष्णमूर्ती यांनी जुनैद अहमद यांचा 71 टक्क्यांहून अधिक मतांनी पराभव केलाय.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती (Raja Krishnamurthy) यांनी इलिनॉय राज्यातून डेमोक्रॅटिक पक्षाची प्राथमिक निवडणूक (Illinois Democratic Party Primary Election) जिंकलीय. कृष्णमूर्ती यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी जुनैद अहमद (Junaid Ahmed) यांचा मोठ्या फरकानं पराभव केलाय.

इलिनॉय राज्यात अत्यंत लोकप्रिय असलेल्या कृष्णमूर्ती (वय 48) यांनी जुनैद अहमद यांचा 71 टक्क्यांहून अधिक मतांनी पराभव केलाय. या विजयानंतर कृष्णमूर्ती म्हणाले, 'या विजयामुळं मला खूप सन्मान मिळालाय. इलिनॉय राज्यामधील आठव्या जिल्ह्यातील डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांनी मला पुन्हा यूएस काँग्रेसचा (US Congress) सदस्य होण्यासाठी मोठ्या संख्येनं मतदान केलं. इलिनॉय प्रांतातील लोकांना शांतता, प्रगती आणि समृद्धी हवीय. याशिवाय, महागाई आणि गॅसच्या वाढत्या दराविरोधातही मी आवाज उठवणार आहे. येत्या काही महिन्यांत या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मी अथक प्रयत्न करत राहीन.'

दरम्यान, भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती हे 2017 पासून इलिनॉयच्या 8 व्या जिल्ह्यासाठी अमेरिकन काँग्रेसचे सदस्य म्हणून काम करत आहेत. कृष्णमूर्ती यांचे आई-वडील तामिळनाडूचे (Tamil Nadu) आहेत. राजा कृष्णमूर्ती हे तीन वेळा अमेरिकन काँग्रेसचे सदस्य राहिले आहेत. राजा कृष्णमूर्ती यांचा जन्म नवी दिल्लीत झालाय. आता 8 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा सामना रिपब्लिकन पक्षाच्या ख्रिस डर्गिसशी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT