Indian Student Fatally Shot in the USA
esakal
Indian student shot dead in the USA: अमेरिकेत अखेर भारतीयांबरोबर नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कारण, एका पाठोपाठ एक भारतीयांची हत्या होत आहेत. आताच्या नुकत्याच घडलेल्या प्रकरणात टेक्सासच्या डलास येथे एका गॅस स्टेशनवर काम करणारा अवघा २८ वर्षीय भारतीय विद्यार्थी चंद्रशेखर पोल याची शुक्रवारी रात्री एका अज्ञात बंदूकधारीने गोळ्या झाडून हत्या केली.
एवढंच नाहीतर मागील महिन्यातच याच शहरात एका आणखी भारतीय व्यक्तीची अतिशय निर्घृण हत्या केली गेली होती. चंद्र मौली नामल्लैया असं नाव असणाऱ्या या भारतीय व्यक्तीचं डोकंच धडापासून वेगळं केलं होतं. त्यानंतर आता ही घटना समोर आल्याने अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
चंद्रशेखर पोल हा विद्यार्थी हैदराबादचा होता आणि भारतात दंतचिकत्सा विषयातील पदवी पूर्ण केल्यानंतर, २०२३पासून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. शिवाय, त्याने नुकतीच आपली मास्टर डिग्रीही पूर्ण केली होती आणि पूर्णवेळ नोकरीच्या शोधात असताना, पेट्रोल पम्पवर पार्ट टाईम जॉबही तो करत होता.
आता या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा मृतदेह अमेरिकेतून भारतात परत आणण्यासाठी सरकारकडे मदत मागितली आहे. बीआरएस आमदार आणि तेलंगणाचे माजी मंत्री टी. हरीश राव यांनी देखील या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची मागणी उचलून धरली आहे.
मागील महिन्यात टेक्सासच्या डलासमध्ये मूळ भारतीय असलेल्या मोटल मॅनेजर चंद्रमौली बॉब नागमल्लैया यांची त्यांची पत्नी आणि मुलासमोर वॉशिंग मशीनवरून झालेल्या वादानंतर निर्घृण हत्या केली गेली होती. या घटनेतील आरोपीची ओळख पटली होती आणि तो एक अट्टल गुन्हेगार होता, त्याला अटकही केली गेली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.