vaccine
vaccine 
ग्लोबल

'कोविशील्ड' लसीमुळे रक्तात गुठळ्या? खबरदारी म्हणून आयर्लंडमध्येही लसीकरणास ब्रेक

सकाळवृत्तसेवा

लंडन : नॉर्वेमध्ये कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरणाची मोहिम सुरु आहे. यामध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाची 'कोविशिल्ड' ही लस देण्यात येत आहे. मात्र, आता या लसीच्या लसीकरणाला थांबवण्यात आलं आहे. ही लस दिल्यानंतर शरीरातील रक्तात गुठळ्या होण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यानंतर आयर्लंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी काल रविवारी या लसीच्या वापरावर काही काळासाठी बंदी घातली आहे. आयर्लंडचे डिप्टी चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. रोनन ग्लिन यांनी म्हटलं की, नॉर्वेच्या मेडिसिन्स एजेन्सीच्या म्हणण्यानुसार, एस्ट्राझानेकाची लस दिल्यानंतर वयस्कर लोकांमध्ये रक्तात गुठळ्या होण्याची चार प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर या लसीवर प्रतिबंध आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, लसीकरण आणि या प्रकरणांच्या दरम्यानचा सहसंबंध अद्याप सुस्पष्ट नाहीये. मात्र, खबरदारी म्हणून हा प्रतिबंध लागू करण्यात आला आहे.  

बुल्गारियाचे पंतप्रधान बोयको बोरिसोव यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत म्हटलंय की, जोपर्यंत सगळ्या शंका दूर होत नाहीत आणि तज्ज्ञांकडून खात्री मिळत नाही तोपर्यंत आम्ही लसीकरण थांबवत आहोत. पुढे त्यांनी म्हटलं की युरोपिय मेडीसीन एजन्सीकडून ही लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा मिळाल्याशिवाय लसीकरण पुन्हा सुरु होणार नाही. थांयलंडने देखील याच कारणास्तव लसीकरण थांबवलं आहे. तर रोमानिया आणि इटलीने खास बॅचमधील लसीच्या खेपेचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

ऑस्ट्रियाने देखील खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. तर फ्रान्स, पोलंड आणि नायजेरिया म्हटलंय की ते या लसीचा वापर सुरु ठेवतील.. ब्रिटनने देखील स्पष्ट केलंय की एस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे लोकांचं रक्त गोठण्यासंदर्भात कसलीही माहिती मिळाली नाहीये. ब्रिटनमध्ये एस्ट्राझेनेका लसीचे 1.1 कोटीहून अधिक डोस लोकांना दिले गेले आहेत.  

युरोपातील अनेक देशांनी एस्ट्राझेनकाच्या कोरोना लशीचा वापर थांबवला आहे. यावरून आता जागतिक आरोग्य संघटनेनं एस्ट्राझेनकाच्या लशीचा वापर थांबवण्याचं कोणतंही कारण नसल्याचं म्हटलं आहे. युरोपात काही देशांमध्ये एस्ट्राझेनकाच्या लसीचे दुष्परिणाम होत असल्याचं समोर आलं होतं. लस घेतलेल्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या आढळल्यानं युरोपिय देशांमध्ये एस्ट्राझेनकाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा वापर कमी केला. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी सांगितलं की, एस्ट्राझेनकाच्या व्हॅक्सिनचा वापर सुरु ठेवायला हवा. एस्ट्राझेनका ही इतर लसींसारखीच चांगली आहे ज्यांचा सध्या जगभरात वापर केला जात आहे. आम्ही मृत्यूच्या डेटाचं विश्लेषण करत आअसून अद्याप कोणाचाही व्हॅक्सिनमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलेलं नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT