Buddha-PAK-Museum
Buddha-PAK-Museum 
ग्लोबल

22 वर्षांनंतर पाकने बाहेर काढल्या दुर्मीळ बुद्ध मूर्ती !

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : गेली 22 वर्षे येथील संग्रहालयाच्या गोदामात ठेवलेली दुर्मीळ बुद्धमूर्ती इस्लामाबाद संग्रहालयाने जनतेला पाहण्यासाठी खुल्या केल्या आहेत. स्वात खोऱ्यात सापडलेली ही मूर्ती तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील आहे. 

इटलीतील पुरातत्त्व शास्त्रज्ञ गिसेप तुसी यांना साठच्या दशकात उत्खननात ही मूर्ती आढळली. ती 1997 पर्यंत संग्रहालयात लोकांना पाहण्यासाठी ठेवली जात होती. बुद्धाच्या चेहऱ्यावरील स्त्रीवैशिष्ट्ये हे या मूर्तीचे दुर्मीळ असण्याचे कारण आहे.

सर्वसाधारण बुद्धमूर्तींमध्ये भगवान बुद्धांचे केस डोक्‍याच्या वर घट्ट बांधलेले असतात आणि डोळेही एका सरळ रेषेत दाखविलेले असतात. या मूर्तीमध्ये मात्र केसांचा बुचडा बांधलेला असून, कपाळावरही केस आलेले दाखविण्यात आले आहेत. या मूर्तीच्या डोळ्यांची रचनाही वेगळी आहे.

कुशान कालावधीतील ही मूर्ती सर्वांत प्राचीन स्तूपांपैकी असलेल्या तिसऱ्या शतकातील बुद्धकारा स्तूपात आढळली होती. श्‍वेत हुणांनी ज्या वेळी आक्रमण करून बुद्ध स्तूप जाळून टाकले, त्या वेळी लोकांनी बुद्ध मूर्तींचे डोके पडक्‍या घरामध्ये व्यवस्थित पुरून ठेवले होते. त्यामुळे आतापर्यंत ते सुरक्षित राहिले. मूर्तीचा उर्वरित भाग अनेक शतकांपासून लक्ष न दिले गेल्याने नष्ट झाला, असे संग्रहालयाचे संचालक डॉ. अब्दुल गफूर लोन यांनी सांगितले. 

या मूर्तीबरोबरच दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकातील आणखी तीन कलाकृतीही संग्रहालयाने गोदामातून बाहेर काढल्या आहेत. भारत पाकिस्तान बुद्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT