jo biden kamla harris
jo biden kamla harris Sakal
ग्लोबल

Video : यु्क्रेनवर बोलताना बायडेन यांचा गोंधळ; कमला हॅरिस यांनी हळूच सांगितले

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine War) युद्धाबाबत अमेरिकन संसदेत बोलताना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (jo biden) गोंधळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा हा व्हिडियो मोठया प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यांच्या या गोंधळाची नेटिझन्सकडून खिल्ली उडवली जात आहे. दरम्यान, बायडेन यांनी उच्चरलेल्या शब्द ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. (Jo Biden Called Ukrainian As Iranian In Parliament)

युक्रेन आणि रशिया यांच्या गेल्या सहा दिवसांपासून घमासान सुरू आहे. या सर्व घडामोडींवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भाष्य करत होते त्यावेळी बायडेन यांनी 'युक्रेनियन नागरिक' ऐवजी इराणी नागरिक असा शब्द प्रयोग केला. त्यांच्या या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, ट्विटरवर 'इरानीयन' शब्द ट्रेंड होऊ लागला आहे.

बायडेन नेमके काय म्हणाले

'किवला लष्कराच्या टँकरने पुतिन घेरण्याचा विचार करत आहेत. मात्र, इराणी लोकांचे मन कधीच जिंकू शकणार नाही.' असे विधान केले. बायडेन यांना युक्रेनियन असे म्हणायचे होते मात्र, चुकून त्यांच्याकडून युक्रेनियन ऐवजी इराणी असा शब्द प्रयोग करण्यात आला. भाषणाच्या या व्हिडिओमद्ये उपराष्ट्रपती कमला हॅरिसही दिसत असून त्या बायडेन यांच्या मागे उभ्या असल्याचे दिसत आहे. बायडेन यांच्या चुकिच्या शब्द प्रयोगानंतर हॅरिस यांनी त्वरित प्रसंगावधान दाखवत मागून युक्रेनियन असे सांगत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

यापूर्वीदेखील चुकले आहेत बायडेन

जो बायडेन यांचा असा चुकिचा शब्द प्रयोग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी म्हणजेच गेल्या वर्षी त्यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना उपाध्यक्ष म्हणण्याऐवजी अध्यक्ष हॅरिस असे संबोधले होते. तर संसदेत भाषणादरम्यान रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना हुकूमशहा म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT