Ladakh, India, China  
ग्लोबल

तूर्तास वाद मिटला; भारत अन् चीन लडाखच्या 'त्या' भागातून सैन्य मागे घेणार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सीमावादावर अखेर तोडगा निघाला आहे. भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर चीनने लडाखच्या गलवान भागातून सैन्य मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे चीन आणि भारत यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती निवळणार आहे. लडाखच्या पूर्व भागातील गलवान परिसरातील वर्चस्वावरुन भारत आणि चीन या दोन देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून लडाख येथील वादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चा सुरु होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याने दोन्ही देशांच्या लष्कराने सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला.  

भारत आणि चीन यांच्यात सीमारेषेवरून मतभेद आहेत. पेंगोंग त्सो आणि गलवान परिसरावर चीन पहिल्यापासून डोळा ठेवत आला असला तरी मागील काही दिवसात या परिसरात मोठ्या प्रमाणावर चीनने घुसखोरी करत तंबू ठोकले आणि बंकरसाठी लागणारे सामान आणले होते. चीनच्या या कृतीचा भारताकडून तीव्र विरोध करण्यात आला. गलवान परिसरातील रस्त्याच्या बांधकामाला चीनने आक्षेप घेतला होता. सीमारेषेवरील परिस्थिती बदलण्याचा भारत प्रयत्न करत असल्याचे चीनकडून आरोप करण्यात आले होते. हे सर्व आरोप भारताने फेटाळून लावत स्थानिक लोकांच्या सुविधेसाठी हा रस्ता भारताच्या आधीन असलेल्या भूभागावरच बांधला असल्याचे बाजू भारताने मांडली होती.

यानंतर सीमारेषेवरील वादग्रस्त भूभागावरून दोन्ही देशातील सैन्याच्या जवानांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार देखील पुढे आला होता. त्यानंतर राजनैतिक स्तरावर चिघळलेली परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. यामध्ये शनिवारी दोन्ही देशांच्या लष्करी  लेफ्टनंट जनरल पदावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये ही बैठक पार पडली. ही बैठक शांतता पूर्वक पार पडत वादग्रस्त मुद्द्यावर चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढण्याची तयारी दोन्ही देशांनी व्यक्त केली. त्यानुसारच लडाखच्या गलवान भागातील गस्ती रेषेजवळ आणि हॉट स्प्रिंग्ज क्षेत्रात चीनने आपले लष्कर नियंत्रण रेषेपासून 2.5 किलोमीटरने मागे घेतले आहे. तर भारताने देखील आपल्यातील काही सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील तणाव कमी होईल अशी अशा आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि चीन यांच्यातील लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चाही सकारात्मक झाली असल्याचे म्हटले होते. पूर्व लडाखमध्ये सुरु असलेल्या वादग्रस्त मुद्द्यावर शांतीच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर चीन आणि भारत यांच्यातील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पुढे देखील अशा बैठका सुरूच राहणार असल्याचे संकेत देखील भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिले होते.  लडाखच्या मुद्द्यावरून चीन आणि भारत यांच्यात लेफ्टनंट जनरल पदावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये बारा बैठका पार पडल्या. तर तीन वेळा मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Mumbai Ganeshotsav:लालबागच्या गर्दीवर रेल्वे पोलिसांचा वॉच: चिंचपोकळी, करी रोडवर २१९ आरपीएफ जवानांसह ५५ तिकीट तपासनीस

SCROLL FOR NEXT