Li Qiang Sworn China's Prime Minister
Li Qiang Sworn China's Prime Minister  esakal
ग्लोबल

China PM : राष्ट्राध्यक्षांच्या अत्यंत जवळचे ली कियांग बनले चीनचे नवे 'पंतप्रधान'; NPC कडून मान्यता

सकाळ डिजिटल टीम

63 वर्षीय ली कियांग हे शी जिनपिंग यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

Li Qiang Sworn China's Prime Minister : ली कियांग यांनी आज चीनचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. चीनच्या संसदेनं राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांचे जवळचे सहकारी ली कियांग यांना देशाचे नवे पंतप्रधान म्हणून घोषित केलं.

सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे (Communist Party of China CPC) ठराव नियमितपणे पास करणाऱ्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या (National People's Congres NPC) वार्षिक अधिवेशनात ली कियांग यांच्या उमेदवारीला मान्यता देण्यात आली. ली यांच्या नावाचा प्रस्ताव खुद्द चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ठेवला होता.

ली कियांग चीनचे नवे पंतप्रधान

63 वर्षीय ली कियांग हे शी जिनपिंग यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. शी जिनपिंग यांच्यानंतर ली कियांग हे सीपीसी आणि सरकारमधील क्रमांक दोनचे अधिकारी असतील. 10 मार्चला चीनच्या संसदेनं शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळाला पाठिंबा दिला. सलग तिसऱ्यांदा त्यांची अधिकृतपणे चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाचे संस्थापक माओ त्से तुंग यांच्यानंतर अध्यक्षपदी तिसऱ्यांदा विजयी होणारे शी जिनपिंग हे पहिले चिनी नेते ठरले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT