tv job 
ग्लोबल

कार्टून बघायचं, डोनट्स खायचे! एवढचं करून 'तो' कमावतो लाखोंचा पगार

अलेक्झांडर टाऊनले एका दिवसात कार्टूनचे 30 एपिसोड्स पाहतो

सकाळ डिजिटल टीम

आजकाल लोकांचा नोकरीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. लोकं ९ ते ५ अश्या वेळेची नोकरी (Job) करण्यापेक्षा लोकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करणे आवडू लागले आहे. अशा कामांना वेळेचे बंधनही नसते. चांगला पगार मिळत असेल तर लोकं ते काम आवडीने करतात. पण जर घरी बसून टिव्हीवरचे (TV) आवडीचे कार्यक्रमच बघण्याचे कोणी पैसे दिले तर? युनायटेड किंग्डमच्या (United Kingdom) नॉर्टिघम (Nottingham) येथे राहणाऱ्या अलेक्झांडर टाऊनले (Alexander Townley) कडे अशीच एक शाही नोकरी आहे.

फक्त बघतो कार्टून

२६ वर्षांचा अलेक्झांडर टाऊनले चा The Simpsons हा कार्टून शो अतिशय आवडीचा आहे. ती मालिका तो तासन्तास पाहू शकतो. ती बघण्यासाठी त्याला दरवर्षी £5,000 एवढे म्हणजे पाच लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतात. महत्वाचं म्हणजे ही मालिका दररोज बघण्याची गरज नाही. त्याला ही नोकरी काही दिवसच करायची असते. पण हा कार्यक्रम आरामात बघण्यासाठी त्याला डोनट्सचे पॅकेटही पाठवले जातात. गोड खात खात तो ही नोकरी करतो आहे. त्याच्या भावाने त्याला या नोकरीविषयी सांगितल्यावर तो लगेच तयार झाला.

अशाप्रकारे करतो काम

असं नेमकं तो करतो काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर अलेक्झांडर टाउनलीला कार्टून मालिकेचे सर्व भाग बारकाईने बघून त्याचे विश्लेषण करायचे असते. त्यामुळे त्याला अतिशय गांभीर्याने काम करावे लागते. ही मालिका बघताना तो कागद-पेन घेऊन बसतो आणि एपिसोडच्या क्रेडिट्सपासून शेवटपर्यंत सर्व काही लिहितो. काय बदल करणं गरजेचं आहे हेही नोंदवतो. ऐकायला थोडे वेगळे वाटले तरी अलेक्झांडरसाठी हे काम आहे. तो एका दिवसात 30 एपिसोड पाहतो आणि एकूण 717 एपिसोड्स पाहून त्यांचे विश्लेषण करतो. याशिवाय तो एका कॅफेमध्ये सुपरवायझर म्हणूनही काम करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT